Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध लज्जास्पद कामगिरीनंतर टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात कमबॅक करणार का? प्लेइंग 11 मध्ये बदल होणार

मालिकेतील तिसरा सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे खेळला जाईल. दोन सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे, कारण एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 01, 2025 | 12:18 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय

फोटो सौजन्य - बीसीसीआय

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी
  • दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज फेल
  • तिसरा सामना भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ नोव्हेंबर रोजी खेळणार 

पाच सामन्यांच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना काल मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारताने फक्त १२५ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने १४ व्या षटकात ६ गडी गमावत १२६ धावांचे लक्ष्य गाठले. जोश हेझलवूडने धोकादायक गोलंदाजी केली, ३ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. अभिषेक शर्माने ६८ धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. हर्षित राणाने ३५ धावा केल्या, पण शेवटी अभिषेक एकटाच राहिला. भारताकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. 

मालिकेतील तिसरा सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे खेळला जाईल. दोन सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे, कारण एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने चांगली सुरुवात केली पण तो सामना पावसामुळे झाला नाही. तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी फारच निराशाजनक राहिली. भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. 

Australia win the second T20I by 4 wickets.#TeamIndia will look to bounce back in the next match. Scorecard ▶ https://t.co/7LOFHGtfXe#AUSvIND pic.twitter.com/rVsd9Md9qh — BCCI (@BCCI) October 31, 2025

कालच्या सामन्यामध्ये तर शिवम दुबे याच्या आधी फलंदाजीसाठी हर्षित राणा याला पहिले फलंदाजीसाठी पाठवले होते. त्याचबरोबर त्याला पाठल्यानंतर हर्षित राणा याने संघासाठी 35 धावांची खेळी खेळली. त्यानंतर भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा या अभिषेक शर्माने केल्या होत्या त्याच्या जोरावर भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 125 धावा केल्या होत्या. यामधील 68 धावा या फक्त अभिषेक शर्माने केल्या होत्या. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा सामना हा उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामना भारताच्या संघाला मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी जिंकणे गरजेचे आहे. भारताच्या संघाने मागील सामन्यामध्ये फारच निराशाजनक फलंदाजी केली आहे त्यामुळे आता होणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजांची कामगिरी दुसऱ्या सामन्यात 

  • शुभमन गिल 5 (10)
  • सुर्यकुमार यादव 1 (4)
  • अक्षर पटेल 7 (12)
  • संजू सॅमसन 2 (4)
  • शिवम दुबे 4 (2)
  • तिलक वर्मा 0 (2)
  • कुलदीप यादव  0 (6) 
  • वरुण चक्रवर्ती 0 (1)
  • जसप्रीत बुमराह 0 (1)
  • हर्षित राणा 35 (33)
  • अभिषेक शर्मा 68 (37)

Web Title: Ind vs aus will team india make a comeback in the third match after a humiliating performance against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • cricket
  • Gautam Gambhir
  • Harshit Rana
  • IND VS AUS
  • Sports

संबंधित बातम्या

Shreyas iyer Health Update : श्रेयस अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज, BCCI ने भारतात परतण्याची केली घोषणा
1

Shreyas iyer Health Update : श्रेयस अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज, BCCI ने भारतात परतण्याची केली घोषणा

इंग्रजांचा क्रिकेटचा नियम BCCI ने मोडला! पहिल्यांदाच, कसोटी सामन्यांमध्ये दुपारच्या जेवणापूर्वी होणार चहापानाचा ब्रेक
2

इंग्रजांचा क्रिकेटचा नियम BCCI ने मोडला! पहिल्यांदाच, कसोटी सामन्यांमध्ये दुपारच्या जेवणापूर्वी होणार चहापानाचा ब्रेक

PAK vs SA : बाबर आझम फेल झाल्यानंतर पाकिस्तानची केला कमबॅक! दक्षिण आफ्रिकेचा निराशाजनक पराभव, मालिकेत बरोबरी
3

PAK vs SA : बाबर आझम फेल झाल्यानंतर पाकिस्तानची केला कमबॅक! दक्षिण आफ्रिकेचा निराशाजनक पराभव, मालिकेत बरोबरी

ZIM vs AFG : राशीद आणि इब्राहिमची अद्भुत कामगिरी, अफगाणिस्तानने घेतली झिम्बाब्वेविरुद्ध 2-0 अशी अजिंक्य आघाडी
4

ZIM vs AFG : राशीद आणि इब्राहिमची अद्भुत कामगिरी, अफगाणिस्तानने घेतली झिम्बाब्वेविरुद्ध 2-0 अशी अजिंक्य आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.