IND Vs BAN: चेपॉकच्या मैदानात भारताने वाजवली बांगलादेशची पुंगी; अवघ्या १४९ मध्ये केलं पॅकअप
चेन्नई: सध्या भारत विरुद्ध बांगलादेश असा कसोटी सामना सुरू आहे. आजपासूनच या पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची मानली जात आहे. पहिल्या डावामध्ये भारताचा डगमगलेला डोलारा अश्विन आणि जाडेजाने सावरला. ३७६ धावांचा डोंगरच भारताने बांग्लादेशसमोर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १५० धावा देखील करू शकला नाही. भारताच्या गोलंदाजांपुढे बांगलादेशचे फलंदाज टिकू शकले नाहीत.
बांगलादेशचे फलंदाज ज्या वेळेस मैदानात खेळण्यासाठी उतरले. तेव्हापासूनच या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच बांगलादेशला धक्के दिले. आघाडीच्या फलंदाजांना या दोन्ही गोलंदाजानी स्वस्तात परत पाठवले.
बांग्लादेशकडून कोणत्याच फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. शाकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावा घेतल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने ४, आकाशदीपने २, रवींद्र जाडेजाने २, मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. यापूर्वी भारताचा डाव ३७६ धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवशी भारताचा डाव लवकर आटोपला. सुरूवातीला जाडेजा लगेचच बाद झाला. रविचंद्रन अश्विन देखील ११३ धावांवर बाद झाला.
Innings Break!
Four wickets for Bumrah and two apiece for Siraj, Akash Deep and Jadeja as Bangladesh are all out for 149 runs.
Trail by 227 runs.
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/hT7IKyTlqW
— BCCI (@BCCI) September 20, 2024
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. आतापर्यंत त्याने बांग्लादेशविरुद्ध ३ विकेट घेत इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ४०० बळी घेणारा तो १०वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याकडून धारदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे. बांग्लादेशचे फलंदाज जस्सीचा चेंडू नीट समजून घेऊ शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनंतर त्याने ४०० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंत त्याने ६.५ षटकांच्या स्पेलमध्ये २८ धावा देऊन ३ बळी घेतले आहेत. शादमान इस्लाम, मुशफिकूर रहीम आणि हसन महमूद यांना लक्ष्य करत त्यांनी इतिहास रचला आहे.