Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS BAN : BCCI कडून बांगलादेश दौरा रद्द! ‘या’ वर्षापर्यंत टी-२० आणि वनडे मालिका खेळण्यास मनाई.. 

भारत बांगलादेश दौऱ्याला रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा दौरा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे औपचारिकपणे सांगण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 05, 2025 | 07:17 PM
IND VS BAN: BCCI cancels Bangladesh tour! Banned from playing T20 and ODI series till 'this' year..

IND VS BAN: BCCI cancels Bangladesh tour! Banned from playing T20 and ODI series till 'this' year..

Follow Us
Close
Follow Us:

BCCI cancels Bangladesh tour : भारत बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता, परंतु त्यापूर्वीच हा दौरा रद्द करण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तथापि, तो एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे औपचारिकपणे सांगण्यात आले आहे. बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डकडून संयुक्त निवेदन देणे अपेक्षित आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि बांगलादेशमधील सध्याच्या राजनैतिक परिस्थिती पाहता, बीसीसीआयकडून  बांगलादेश दौऱ्यावर संघ न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार होता. १७, २० आणि २३ ऑगस्ट रोजी तीन एकदिवसीय सामने आणि २६, २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी तीन टी-२० आंतरराष्ट्रीय समन्यांचे आयोजन करण्यात आले होते.  हे सामने मीरपूर आणि चितगाव येथे खेळवण्यात येणार होते. पण आता ही मालिका सप्टेंबर २०२६ पर्यंत खेळवली जाणार नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : Ind vs Eng under 19 : Vaibhav Suryavanshi नावाची रनमशीन थांबेना! इंग्लंडमध्ये रचला इतिहास, युवा वनडेमध्ये ठोकले सर्वात जलद शतक

बांगलादेश क्रिकेट बोर्ड काय म्हणाले?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले की, ते सप्टेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी भारताचे स्वागत करणार आहे. दौऱ्याच्या नवीन तारखा आणि वेळापत्रक वेळेवर जाहीर करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी दौऱ्याबाबत सुरू असलेल्या अनिश्चिततेवर भाष्य केले होते. आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये भारताचे अव्वल खेळाडू खेळताना दिसण्याची शक्यता आहे. जी भारतीय स्थानिक हंगामाची सुरुवात असणार आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : जेमी स्मिथने रचला इतिहास! इंग्लंडसाठी केला ‘हा’ पराक्रम; असे करणारा ठरला पहिला यष्टिरक्षक फलंदाज

रोहित आणि विराटचे पुनरागमन लांबणीवर..

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा ही एकदिवसीय मालिका खेळणार होते. २०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर दोन्ही अनुभवी खेळाडूंकडून टी-२० मधूनही निवृत्ती जाहीर करण्यात आली होती.  आता कसोटी क्रिकेटला निरोप दिल्यानंतर, एकदिवसीय हा एकमेव प्रकार शिल्लक आहे ज्यामध्ये हे दोन दिग्गज खेळत आहेत. तथापि, दौऱ्याच्या नवीन तारखा निश्चित झाल्यावर त्यांना संघात समाविष्ट करण्यात येईल की नाही याबाबत अद्याप काही एक स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Ind vs ban bcci cancels bangladesh tour banned from playing t20 and odi series till 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS BAN

संबंधित बातम्या

प्रतिका रावलला मेडल दिल्यामुळे जय शाह यांना गोष्ट खटकली!icc चे अध्यक्ष घेणार मोठा निर्णय
1

प्रतिका रावलला मेडल दिल्यामुळे जय शाह यांना गोष्ट खटकली!icc चे अध्यक्ष घेणार मोठा निर्णय

‘फक्त नाटक आहेत…’ मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अजित आगरकर आणि बीसीसीआयला यांना फटकारले
2

‘फक्त नाटक आहेत…’ मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अजित आगरकर आणि बीसीसीआयला यांना फटकारले

ज्युनियर्सवर हल्ला केल्याचा आरोप झाल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने दिले स्पष्टीकरण, म्हटले “परस्पर द्वेष आणि राग…”
3

ज्युनियर्सवर हल्ला केल्याचा आरोप झाल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने दिले स्पष्टीकरण, म्हटले “परस्पर द्वेष आणि राग…”

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय
4

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.