Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG Live: तिसऱ्या वनडे सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बांधली काळी पट्टी, मौनही पाळले; नेमकं कारण काय?

IND ENG Players Wearing Black bands During Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. यासोबतच एक मिनिटांचे मौनही बाळगले होते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 07:04 PM
IND vs ENG Live: तिसऱ्या वनडे सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बांधली काळी पट्टी, मौनही पाळले; नेमकं कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • भारत-इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून का उतरले?
  • खेळाडू आणि प्रेक्षकांनी श्रद्धांजली वाहिली
  • भारताने तिसऱ्या सामन्यासाठी संघात केले तीन बदल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो मालिकाही जिंकेल. सामन्याआधी या दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांतील खेळाडूंनी एक मिनिटाचे मौनही पाळले.

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! गौतम गंभीर नव्हे, VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत,नेमकं कारण काय?

खेळाडू आणि प्रेक्षकांनी वाहिली श्रद्धांजली

वेस्ट इंडिज क्रिकेटचे महान खेळाडू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे १७ जुलै रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बीसीआयने सोशल मीडीयावर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहिले की, ‘शुक्रवारी सर गार्फिल्ड सोबर्स यांचे दुखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.’ क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर सामना सुरू होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले. यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू आणि मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक एकत्र उभे राहून त्या महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहताना दिसले. यापूर्वी, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने पारंपरिक घंटा वाजवून खेळाला सुरुवात केली.

#TeamIndia is wearing black armbands to pay tribute to West Indies legend Sir Garfield Sobers following his passing on Friday.#ENGvIND pic.twitter.com/cYXAWc40iT — BCCI (@BCCI) July 19, 2026

भारताने तिसऱ्या सामन्यासाठी संघात केले तीन बदल

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह डाव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. नाणेफेकीपूर्वी बुमराहची फिटनेस टेस्ट घेण्यात आली, परंतु तो ती पास होऊ शकला नाही. त्यामुळे बुमराहला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

गोल्डन बूटची शर्यत रंगली! एम्बाप्पेचा FIFA विश्वचषकात जलवा; मेस्सीला मागे टाकत मोडला ‘हा’ विक्रम

Web Title: Ind vs eng 3rd odi players wear black bands garfield sobers tribute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • India vs England 3rd ODI
  • Lord's Cricket Ground

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.