Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : ‘भारताचा विजय होणार, मला याची माहिती..’, संघाच्या विजयाने ‘हा’ माजी ‘दादा’ कर्णधार आनंदी..

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. या विजयांनंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आनंद व्यक्त करत म्हटले की "भारत जिंकणार मला माहित होते."

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 05, 2025 | 11:07 AM
IND vs ENG: 'India will win, I know this..', 'This' former 'Dada' captain is happy with the team's victory..

IND vs ENG: 'India will win, I know this..', 'This' former 'Dada' captain is happy with the team's victory..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. भारताने इंग्लंडवर संघर्षपूर्ण विजय मिळवला आहे. या विजयात मोहम्मद सिराज विजयाचा शिल्पकार ठरला. भारताच्या या विजयाने संपूर्ण देशात आनंद व्यक्त होत आहे. अशातच भारतीय संघाचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली टीम इंडियाच्या या विजयावर आनंद व्यक्त करत म्हटले आहे की, त्याला आधीच आशा होती की टीम इंडिया पाचव्या कसोटीमध्ये विजय मिळवेल.

भारतीय संघात खूप प्रतिभा

सौरव गांगुलीने पत्रकारांना सांगितले की, “चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा माझ्या मनात होते की भारतच जिंकणार. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती खूपच शानदार होती. भारतीय संघात खूप प्रतिभा असून ही तरुण टीम उत्तम आहे.”

सिराजने तरुणांसाठी एक आदर्श ठेवला : मोहम्मद कैफ

हेही वाचा : IND vs ENG 5th Test : गौतम गंभीर सामना जिंकल्यानंतर वेडावला! बीसीसीआयच्या पोस्टमध्ये उघड, Video Viral

माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने देखील भारताच्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आयएएनएसला सांगितले की, “जर जयस्वालने शतक केले नसते तर स्कोअरबोर्डवर बचाव करण्यासाठी धावाच राहिल्या नसत्या. तो आक्रमक फलंदाज आहे, परंतु या डावात तो शांत दिसत होता. या विजयाचे श्रेय जयस्वालला देखील जाते. त्याच्या शतकामुळेच संघाला एवढी धावसंख्या गाठणे सोपे गेले. फलंदाजीच्या दृष्टीने ही सर्वात कठीण अशी खेळपट्टी होती.”

कैफ पुढे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे देखील कौतुक केले आणि म्हटले की, “त्याने सिंहाचे धाडस दाखवले. त्याने सांगितले की तो थकणार नाही. त्याने एक टोक लावून धरले आणि सतत गोलंदाजी करत राहिला. सिराजने तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.” कैफ पुढे म्हणाला की,” शुभमन गिल कर्णधार म्हणून खूप वेगाने शिकत असून सामना अनिर्णित करण्यासाठी त्याला ही कसोटी जिंकावी लागली. तो या सामन्यात खूप शांत दिसला.”

केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या या निर्णायक सामन्यात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती, तर इंग्लंडकडून गस अ‍ॅटकिन्सनने सर्वाधिक पाच बळी टिपले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडला पहिल्या डावात २४७ धावाच करता आल्या आणि नाममात्र २३ धावांची आघाडी मिळवली. यावेळी हॅरी ब्रूकने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या डावात प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : India vs England मालिकेनंतर टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले. या डावात यशस्वी जयस्वालने शतक झळकावताना ११८ धावा केल्या, तर आकाश दीप ६६, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी ५३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारताने ३६७ धावांवर बाद केले. जो रूट (१०५) आणि हॅरी ब्रूक (१११) यांनी शतके झळकावली पण ते संघाला विजय मिळवू शकले नाहीत. अखेर पाचव्या दिवशी भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने चार बळी टिपले.

Web Title: Ind vs eng india will win i know this sourav ganguly happy with the teams victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • IND Vs END
  • Mohammad Kaif
  • Mohammad Siraj
  • Saurabh Ganguly

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.