Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘बुमराहची क्षमता असाधारण, त्याच्याविना विजय म्हणजे..’, क्रिकेटचा देव तेंडुलकरकडून ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराह संघाचा भाग नसलेल्या सामन्यात भारतने दोन विजय मिळवले. अशा वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखण केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 07, 2025 | 07:36 PM
IND Vs ENG: 'Bumrah's ability is extraordinary, victory without him means..', God of Cricket Tendulkar backs 'Yorker King'

IND Vs ENG: 'Bumrah's ability is extraordinary, victory without him means..', God of Cricket Tendulkar backs 'Yorker King'

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत बुमराह भाग नसणाऱ्या सामन्यात भारताचे दोन विजय.
  • सचिन तेंडुलकरकडून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पाठराखण.
  • बुमराह करिष्माई वेगवान गोलंदाज, तेंडुलकरकडून कौतुक.

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. अतिशय रंजक ठरलेली ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत भारतीय सघांने शानदार कामगिरी केली. नवखा युवा कर्णधार शुभमन गिलध्यान नेतृत्वाखाली संघाने आपली क्षमता दाखवून दिली. शेवटच्या सामन्यातील रोमांच अंगावर काटे उभा करणारा होता. ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला. या विजयचा खरा हिरो ठरला मोहम्मद सिराज. त्याने या सामन्यात दोन्ही डाव मिळून ९ विकेट्स घेतल्या. या दरम्यान जे दोन सामने भारताने जिंकले त्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नव्हता. त्यामुळे कसोटी मधील त्याचे महत्व कमी होत आहे का/ अशी चर्चा रंगू लागली आहे. अशा वेळी सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखतं करत म्हटले की, बुमराहशिवाय विजय हा निव्वळ योगायोग आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंड दौरा संपताच Karun Nair ची निवृत्तीची घोषणा? लिहिली भावूक पोस्ट; चाहत्यांकडून देण्यात आल्या शुभेच्छा..

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताचा विजय हा केवळ एक ‘योगायोग’ होता असे महान फलंदाज सचिन तेंडुलकर मानतो आणि हा करिष्माई वेगवान गोलंदाज अजूनही ‘असाधारण आणि अविश्वसनीय’ आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच संपलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराहने फक्त तीन सामने खेळले. मालिकेत कमी अनुभव असलेल्या भारतीय संघाने अजूनही इंग्लंडशी २-२ अशी बरोबरी साधली. वर्कलोड व्यवस्थापन योजनेमुळे भारतीय संघाने जिंकलेल्या दोन सामन्यांमध्ये बुमराहची अनुपस्थिती आधीच निश्चित झाली होती.

तेंडुलकर म्हणाले की, बुमराहच्या अनुपस्थितीत बर्मिंगहॅम आणि द ओव्हलमध्ये भारताचा विजय हा केवळ एक योगायोग होता. त्यांनी तीन कसोटी सामन्यांमधील बुमराहच्या कामगिरीबद्दल सांगितले. या वेगवान गोलंदाजाने मालिकेत एकूण १४ बळी घेतले. बुमराने खरोखर चांगली सुरुवात केली, पहिल्या कसोटीत (पहिल्या डावात) पाच बळी घेतले. तो दुसरी कसोटी खेळला नाही पण तिसरी आणि चौथी कसोटी खेळला. त्यानंतर या दोन कसोटींपैकी एका कसोटीत त्याने पाच बळी घेतले. बुमराने खेळलेल्या तीन कसोटींपैकी दोन कसोटींमध्ये त्याने पाच बळी घेतले. मला माहित आहे की लोक अशा अनेक गोष्टींवर चर्चा करत आहेत की ज्या कसोटी सामन्यात तो खेळला नाही ते आम्ही जिंकले.

हेही वाचा : इंग्लंड दौरा गाजवल्यांनंतर गिल BCCI च्या देशांतर्गत स्पर्धेतही करणार सारथ्य; Duleep Trophy 2025 मध्ये ‘या’ संघाचे नेतृत्व करणार

सचिनने संपूर्ण सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे कौतुक केले. तो जेव्हा खेळला, तेव्हा त्याने योगदान दिले आहे. जर तुम्ही दुसऱ्या कसोटीकडे पाहिले तर चौथ्या डावात त्याने पाचव्या दिवशी लंचच्या आधी बेन स्टोक्सला एका शानदार चेंडूने बाद केले. मला वाटते की हा ‘टर्निंग पॉइंट’ होता. शेवटच्या कसोटीत, जेव्हा फलंदाजीची वेळ आली तेव्हा त्याने शानदार फटके मारून ५३ धावा केल्या. त्याने उत्कृष्ट धावगती राखली. जेव्हा कीजवर राहण्याची गरज होती. तेव्हा तो चौथ्या कसोटीत असे करण्यात यशस्वी झाला. पाचव्या कसोटीत जेव्हा त्याला जलद धावा काढायच्या होत्या तेव्हा त्याने ते केले. ‘शाब्बास, वाशी’. मला ते खूप आवडले.

Web Title: Ind vs eng victory without him is mere coincidence sachin tendulkar backs bumrah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Jaspreet Bumrah
  • Mohammad Siraj
  • Sachin Tendulkar
  • Shubhman Gill
  • Test Match

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : T20 सामन्यांमध्ये कुणाची दहशत? शुभमन गिल की संजू सॅमसन? जाणून घ्या २१ सामन्यांचा लेखाजोखा
1

Asia cup 2025 : T20 सामन्यांमध्ये कुणाची दहशत? शुभमन गिल की संजू सॅमसन? जाणून घ्या २१ सामन्यांचा लेखाजोखा

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…
2

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
3

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

‘मी  बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम
4

‘मी बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.