Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE 1st T20: बेलफास्टमध्ये भारत-आयर्लंड सामना; पहिल्याच सामन्यात पाऊस घालणार खोळंबा? सामना रद्द होणार? जाणून घ्या अपडेट

IND vs IRE 1st t20 Weather Report will rain affect in belfast: भारत-आयर्लंड टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळला जाणार आहे. परंतु, या सामन्यात पावसाचे सावट आहे त्यामुळे सामना रद्द होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 26, 2026 | 04:02 PM
IND vs IRE 1st T20: बेलफास्टमध्ये भारत-आयर्लंड सामना; पहिल्याच सामन्यात पाऊस घालणार खोळंबा? सामना रद्द होणार? जाणून घ्या अपडेट
Follow Us
Follow Us:
  • भारत-आयर्लंड पहिला टी-20
  • बेलफास्टमध्ये पावसाचे सावट
  • सामना रद्द होणार?
भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील टी- २० मालिकेला आजपासून सुरुवात आहे. या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष १५ वर्षीय भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. त्याला आज भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. जर वैभव आज मैदानात उतरला, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. पदार्पण करताच तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडू शकतो. पहिला सामना शुक्रवारी २६ जून रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळला जाणार आहे. परंतु, बेलफास्टमधील हवामान खराब असून पावसाची शक्यता आहे. सामन्यादरम्यान बेलफास्टमध्ये हवामान कसे असेल,जाणून घेऊयात.

Ind vs Ire1st T20: भारत-आयर्लंड पहिला टी-20 सामना आज; अय्यरच्या नेतृत्वाची कसोटी, बेलफास्टची खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या

पावसामुळे सामना रद्द होणार?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:०० वाजता सुरू होणार आहे, तर स्थानिक वेळेनुसार तो दुपारी १:३० वाजता सुरू होईल. AccuWeather नुसार, बेलफास्टमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असून ते ४:०० या वेळेत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे सामन्याच्या सुरुवातीस विलंब होऊ शकतो आणि खेळादरम्यान पावसामुळे वारंवार व्यत्यय येऊ शकतो. त्यानंतर हवामान स्वच्छ होण्याची शक्यता आहे. तसेच, आज पूर्ण २० षटकांचा सामना पाहायला न मिळण्याचीही शक्यता आहे.

हवामान अहवालानुसार, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्याची ५० टक्के शक्यता आहे, जी पुढील दोन तासांत आणखी वाढू शकते. बेलफास्टमध्ये आज दुपारी २ वाजता पावसाची शक्यता ५९% आणि दुपारी ३ वाजता ५१% आहे. जरी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हवामान निवळण्याची शक्यता असली तरी, खेळ सुरू होण्यापूर्वी मैदान सुकवण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक राहील. परिणामी, भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो.

पहिला टी२० सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. बेलफास्ट आणि भारतीय वेळेत ४:१५ तासांचा फरक आहे. त्यामुळे सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:०० वाजता सुरू होईल.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११

भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम

Web Title: Ind vs ire 1st t20 belfast weather report rain will affect match playing 11 vaibhav suryavanshi debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
3

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
4

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.