Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE 2nd T20 Live: प्रिन्स यादव चमकला; पदार्पणात 3 विकेट्स; आयर्लंडचे भारतासमोर 155 धावांचे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20 First inning Live: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजीसाठी आलेल्या आयर्लंडने टीम इंडियाला १५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 08:13 PM
IND vs IRE 2nd T20 Live: प्रिन्स यादव चमकला; पदार्पणात 3 विकेट्स; आयर्लंडचे भारतासमोर 155 धावांचे लक्ष्य
Follow Us
Follow Us:
  • प्रिन्स यादव चमकला
  • पदार्पणात 3 विकेट्स
  • आयर्लंडचे भारतासमोर 155 धावांचे लक्ष्य
भारत आणि आयर्लंड यांच्यात आज दोन सामन्यांच्या मालकेतील दुसरा टी२० सामना बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आयर्लंडला प्रथम फंलदाजी करण्याचे आमंत्रण दिले. प्रथम फंलदाजी करत आयर्लंडने ८ विकेट्स गमावून  १५४ धावा केल्या. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या जोरावर आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. तर भारताकडून पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवने  चमकदार कामगिरी करत ३ विकेट्स घेतले.

महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के

हॅरी टेक्टरच्या अर्धशतक,आयर्लंडचे भारतासमोर 155 धावांचे लक्ष्य

पहिली फलंदाजी करण्यासाठी आयर्लंड संघाची सुरुवात प्रभावी नव्हती. संघाचे सलामीवीर टिम टेक्टर ५ धावा आणि रॉस अडायर १६ धावा करुन बाद झाले. कर्णधार लॉर्कन टकरने १५ धावा केल्या आणि हॅरी टेक्टरसोबत तिसऱ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरन सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. बेंजामिन कॅलिट्झने हॅरीसोबत चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. यानंतर, कॅलिट्झ ३७ धावांवर आणि गॅरेथ डेलानी शून्यावर एकाच षटकात बाद झाले. आयर्लंडचा निम्मा संघ ११३ धावांत सर्वबाद झाला. जॉर्ज डॉकरेलने १९ आणि लियाम मॅकार्थीन दोन धावा केल्या. बेलफास्टच्या मैदानावर आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले.

पदार्पणात प्रिन्स यादव चमकला

आंतरराष्ट्रीय टी- २० सामन्यात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने भारतासाठी तीन विकेट्स घेतले. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, तर हर्षित राणाने एक विकेट घेतला.

वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि अष्टपैलू सूर्यांश शेडगे यांनी प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची जागा घेतली. पहिल्या टी२० मध्ये आयर्लंडने विश्वविजेत्या भारताला पराभूत केले होते. आता, भारतीय संघ मालिका ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर ), बेंजामिन क्लॅट्रिज, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेस, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलर्ड.

IND W vs AUS W Live: भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; ‘करो या मरो’ सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल

Web Title: Ind vs ire live prince yadav 3 wickets ireland 155 target 2nd t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team

संबंधित बातम्या

IND vs IRE 2nd T20 Live: भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रिन्स-शेडगेचे पदार्पण, वैभवला पुन्हा डावलले
1

IND vs IRE 2nd T20 Live: भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रिन्स-शेडगेचे पदार्पण, वैभवला पुन्हा डावलले

IND vs IRE 2nd T20: लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाची परीक्षा; वैभवला मिळणार संधी? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
2

IND vs IRE 2nd T20: लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाची परीक्षा; वैभवला मिळणार संधी? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

Vaibhav Sooryavanshi: ‘प्रत्येक वेळेस तो खेळण्यासाठी…’; अभिषेक शर्माचे वैभवबाबत मोठे विधान
3

Vaibhav Sooryavanshi: ‘प्रत्येक वेळेस तो खेळण्यासाठी…’; अभिषेक शर्माचे वैभवबाबत मोठे विधान

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण
4

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.