
IND vs NZ 2nd T20I Match: India wins by 7 wickets in Raipur; takes the lead in the series.
IND VS NZ 2nd T20l Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने हे लक्ष्य इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १५.२ ओव्हरमध्येच पूर्ण करून ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताने या विजयासह मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून जेकब डफीने १ विकेट घेतली.
भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. न्यूझीलंड संघाने रचीन रवींद्रच्या ४४ धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर ६ गडी गामावत २०८ धावा केल्या आणि भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडून ककुलदीप यादवने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
न्यूझीलंडने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा भोपळा न फोडता माघारी गेला आणि संजू सॅमसन देखील ६ धावा करून माघारी गेला. भारताने ६ धावांवर आपले दोन सलामीवीर गमावले होते. समोर २०० प्लसचे टार्गेट असताना भारत अडचणीत दिसत होता. परंतु, इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सांभाळत ५ व्या विकेट्ससाठी १२२ धावांची भागीदारी केली. इशानने २१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर इशान ३१ चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार लगावले आहे. त्याला ईश सोढीने बाद केले.
As breathtaking as it can get 💥#TeamIndia sail over the finish line with 7⃣ wickets to spare in Raipur ⛵️ With that, they lead the series 2⃣-0⃣ 👏 Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UXOo96Qbup — BCCI (@BCCI) January 23, 2026
त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव २३ चेंडूत ५० धावा करत आपले इरादे स्पष्ट केले. पुढे त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. इशाननंतर आलेल्या शिवम दुबेला सोबत घेत सूर्याने नाबाद ८१ धावांची भागीदारी करत भारताच्या विजायवर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, सूर्या ३७ चेंडूत ८२ धावा काढून नाबाद राहिला. यामध्ये त्याने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. तर शिवम दुबे १८ मध्ये १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावा काढून करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, ईश सोढी आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताचा संघ :भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडचा संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी