Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ Final: भारत-न्यूझीलंड जेतेपदाच्या लढतीसाठी पंचांची घोषणा! ‘या’ दिग्गजांवर सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 06, 2026 | 07:33 PM
भारत-न्यूझीलंड जेतेपदाच्या लढतीसाठी पंचांची घोषणा! (Photo Credit- X)

भारत-न्यूझीलंड जेतेपदाच्या लढतीसाठी पंचांची घोषणा! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • भारत-न्यूझीलंड जेतेपदाच्या लढतीसाठी पंचांची घोषणा!
  • ‘या’ दिग्गजांवर सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी
  • थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी कोण?
India national Cricket team vs New Zealand national cricket team: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रंगणार आहे. या ऐतिहासिक खिताबी लढतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सज्ज झाली असून, सामन्यासाठी मॅच ऑफिशियल्सच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मैदानी अंपायर म्हणून इंग्लंडच्या दोन अनुभवी अंपायर्सवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रिचर्ड इलिंगवर्थ आणि अ‍ॅलेक्स व्हार्फ सांभाळणार धुरा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या हाय-व्होल्टेज सामन्यात इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि अ‍ॅलेक्स व्हार्फ हे ‘ऑन-फिल्ड’ अंपायर (मैदानी पंच) म्हणून काम पाहतील. विशेष म्हणजे, रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यासाठी हा सलग दुसरा टी-२० वर्ल्ड कप फायनलचा अनुभव असणार आहे. २०२४ मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते, तेव्हाही इलिंगवर्थ यांनीच अंतिम सामन्यात अंपायरिंग केले होते.

Experienced duo set to take charge in the middle as @emirates match officials confirmed for the #T20WorldCup Final 🙌
https://t.co/juiB1m6ahS
— ICC (@ICC) March 6, 2026

इलिंगवर्थ यांची गणना जगातील सर्वात अनुभवी अंपायर्समध्ये केली जाते. त्यांनी यापूर्वी २०२३ चा वनडे वर्ल्ड कप आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्या अंतिम सामन्यातही मैदानी पंचांची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्यासोबत अ‍ॅलेक्स व्हार्फ हे दुसऱ्या टोकाकडून धुरा सांभाळतील, जे आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये सामील आहेत.

IND vs NZ T20 WC Final: काय सांगता! न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी; ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी फिरणार?

थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी कोण?

मैदानी पंचांव्यतिरिक्त, तिसऱ्या अंपायरची (TV अंपायर) जबाबदारी दक्षिण आफ्रिकेच्या अल्लाहुद्दीन पालेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ४८ वर्षीय पालेकर यांना मार्च २०२५ मध्ये आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळाले असून त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत ६ सामन्यांमध्ये उत्कृष्ट अंपायरिंग केले आहे. तसेच, झिम्बाब्वेचे एंडी पायक्रॉफ्ट हे अंतिम सामन्यात ‘मॅच रेफरी’ म्हणून काम पाहतील. चौथ्या अंपायरची जबाबदारी एड्रियन होल्डस्टॉक यांच्याकडे असेल.

अंतिम सामन्यासाठी मॅच ऑफिशियल्सची यादी:

  • मैदानी अंपायर (On-Field): रिचर्ड इलिंगवर्थ आणि अ‍ॅलेक्स व्हार्फ
  • तिसरे अंपायर (Third Umpire): अल्लाहुद्दीन पालेकर
  • चौथे अंपायर (Fourth Umpire): एड्रियन होल्डस्टॉक
  • मॅच रेफरी (Match Referee): एंडी पायक्रॉफ्ट

दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

या विश्वचषकात दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, टीम इंडियाने रोमांचक सामन्यात इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत फायनलचे तिकीट मिळवले. आता ८ मार्च रोजी होणाऱ्या या महामुकाबल्यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा

Web Title: Umpires announced for india new zealand final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • T20 World Cup 2026
  • T20 world cup final
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs NZ T20 WC Final: काय सांगता! न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी; ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी फिरणार?
1

IND vs NZ T20 WC Final: काय सांगता! न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी; ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी फिरणार?

T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा
2

T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा

T20 WC 2026: अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट गरजणार, खराब फॉर्म असूनही संजू सॅमसन धावला मदतीला
3

T20 WC 2026: अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट गरजणार, खराब फॉर्म असूनही संजू सॅमसन धावला मदतीला

T20 World Cup 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकनांची झाली घोषणा! 8 खेळाडू शर्यतीत; यादीत फक्त 1 भारतीय
4

T20 World Cup 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकनांची झाली घोषणा! 8 खेळाडू शर्यतीत; यादीत फक्त 1 भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.