Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ T20 WC Final: काय सांगता! न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी; ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी फिरणार?

IND vs NZ Head to Head: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 06, 2026 | 06:03 PM
न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी (Photo Credit- X)

न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • काय सांगता!
  • न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी
  • ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी फिरणार?
India national Cricket team vs New Zealand National cricket team: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा (T20 World Cup 2026) महामुकाबला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी मैदानात उतरेल. मात्र, इतिहासाची पाने उलटली तर अंतिम फेरीत न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे दिसून येते. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताला अद्याप एकदाही न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही.

विश्वचषकातील आकडेवारी

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड तीन वेळा आमनेसामने आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, या तिन्ही सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे:

१. २००७ विश्वचषक: पहिल्यांदा झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ १८० धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि १० धावांनी पराभूत झाला.

२. २०१६ विश्वचषक: नागपुरात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने केवळ १२६ धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय फलंदाजी कोलमडली आणि अवघ्या ७९ धावांत संपूर्ण संघ गारद झाला. भारताला हा सामना ४७ धावांनी गमवावा लागला.

३. २०२१ विश्वचषक: दोन्ही संघांची तिसरी भेट दुबईत झाली. भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ ११० धावा केल्या. न्यूझीलंडने ८ गडी राखून हे लक्ष्य सहज गाठले.

T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा

एकूण टी-२० रेकॉर्डमध्ये भारत सरस

टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडचा दबदबा असला, तरी एकूण टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने आपले वर्चस्व राखले आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत ३० सामने खेळले गेले असून, त्यापैकी भारताने १८ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला ११ सामन्यांत यश मिळाले आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. विशेष म्हणजे, या विश्वचषकापूर्वी झालेल्या ५ सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत भारताने मायदेशात न्यूझीलंडचा ४-१ असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारतीय संघ सध्या फॉर्मात असून हा आत्मविश्वास फायनलमध्ये कामाला येऊ शकतो.

इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे. टीम इंडियाकडे ८ मार्च रोजी दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे.  टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध विजयाचे खाते उघडणे. सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ बनण्याचा मान मिळवणे. अहमदाबादच्या लाखो प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर भारतीय संघ हा ‘वर्ल्ड कपमधील शाप’ मोडणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

T20 WC 2026: अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट गरजणार, खराब फॉर्म असूनही संजू सॅमसन धावला मदतीला

Web Title: Indias zero performance in t20 world cup against new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • T20 World Cup 2026
  • T20 world cup final
  • Team India

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा
1

T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा

T20 WC 2026: अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट गरजणार, खराब फॉर्म असूनही संजू सॅमसन धावला मदतीला
2

T20 WC 2026: अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट गरजणार, खराब फॉर्म असूनही संजू सॅमसन धावला मदतीला

T20 World Cup 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकनांची झाली घोषणा! 8 खेळाडू शर्यतीत; यादीत फक्त 1 भारतीय
3

T20 World Cup 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकनांची झाली घोषणा! 8 खेळाडू शर्यतीत; यादीत फक्त 1 भारतीय

IND vs ENG: ‘मी खूप मोठी चूक केली,’ हॅरी ब्रुकने सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर व्यक्त केले दु:ख; संघावर केली टीका
4

IND vs ENG: ‘मी खूप मोठी चूक केली,’ हॅरी ब्रुकने सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर व्यक्त केले दु:ख; संघावर केली टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.