Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय फिरकीपटूंसमोर किवींची दाणादाण, दुसऱ्या इनिंगमध्ये 9 विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या 143 धावांची आघाडी

मुंबईच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय फिरकीपटूंनी गाजवला. यामध्ये रविंद्र जडेजा, रविंचंद्रन अश्विन यांनी जादुई गोलंदाजीने किवी फलंदाजांना वेडे करुन सोडले.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 02, 2024 | 10:40 PM
IND vs NZ 3rd Test 2nd Day New Zealand batsmen completely failed in front of Indian spinners and New Zealand lead by 143 runs after losing 9 wickets in Second Innings

IND vs NZ 3rd Test 2nd Day New Zealand batsmen completely failed in front of Indian spinners and New Zealand lead by 143 runs after losing 9 wickets in Second Innings

Follow Us
Follow Us:

IND vs NZ 3rd Test 2nd Day Report : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत किवींनी याअगोदरच मालिका आपल्या नावावर केलीये. दोन्ही कसोटीत भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या तिसऱ्या कसोटीत वानखेडेवर सुरुवातीपासूनच फिरकीची जादू चालली. या सामन्यात टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनकच झाली. परंतु त्यांनी पहिल्या इंनिंगमध्ये 235 पर्यंत डाव खेचत नेला. त्यानंतर भारतीय फलंदाजी आज दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि शुभमनच्या शानदार भागीदारीमुळे चांगली झाली. परंतु पंतची विकेट गेल्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकामागोमाग विकेट गमावल्या त्यामध्ये शुभमनची 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी होती.

वानखेडेवर भारतीय फिरकीपटूंनी केली कमाल

What a way to get the final wicket of the day 🙌 Make that 4⃣ for Ravindra Jadeja 👏👏 Scorecard – https://t.co/KNIvTEyxU7#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @imjadeja pic.twitter.com/r6sTQSHgYf — BCCI (@BCCI) November 2, 2024

 

भारतीय गोलंदाजी दुसरी इनिंग

तिसऱ्या कसोटी मालिकेत आजचा दुसरा दिवस भारतीय खेळाडूंनी दिवस गाजवला. मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 9 गडी बाद 171 धावा आहे. अशाप्रकारे किवी संघाची आघाडी १४३ धावांपर्यंत वाढली आहे.

न्यूझीलंडची दुसरी इनिंग

न्यूझीलंड फलंदाजीला आल्यानंतर आकाशदीपने लवकरच टॉम लॅथमला 1 धावांवर त्रिफळाचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर काही वेळ डेव्हीड कॉन्वे आणि विल यंगची चांगली भागीदारी चालली. परंतु, त्यांची भागीदारी वॉशिंग्टन सुंदरने मोडली. कॉन्वेने 22 धावा करून पॅव्हेलिनचा रस्ता धरला.  त्यानंतर अश्विनने रचिन रविंद्रला चांगलेच गंडवले आणि पंतने सुरेख स्टम्पिंग करीत अवघ्या 4 धावांवर बाहेर पाठवले.

रविंचंद्रनची भेदक फिरकी गोलंदाजी

Caught and bowled! R Ashwin gets his third wicket of the innings 👏👏 New Zealand 8⃣ down Live – https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @ashwinravi99 pic.twitter.com/eWHmweBHos — BCCI (@BCCI) November 2, 2024

 

भारतीय फिरकीपटूंसमोर किवींची दाणादाण

दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी सामन्यात वर्चस्व राखले. सर्वात धोकादायक जोडी विल यंग आणि डॅरेल मिचेल जोपर्यंत क्रिझवर होते तोपर्यंत टीम इंडियासाठी अवघड होते. असे असताना रविंद्र जडेजाने डॅरेल मिचेलला अश्विनद्वारे झेलबाद केले. डॅरेलने 21 धावा केल्या त्याचा लॉंग ऑनला आर अश्विनने सुरेख झेल पकडला. त्यानंतर पुन्हा एकदा अश्विनने सर्वात मोठी विकेट विल यंगला कॉ अॅंड बॉल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सने जोरदार मारा सुरु केला परंतु अश्विनने जादुई चेंडूने त्याला क्लिनबॉल्ड करीत पिचवर नाचायला भाग पाडले. दुसऱ्या दिवसाच्या अगदी सेशनच्या शेवटी रविंद्र जडेजाने ईश सोधीला विराटद्वारे झेलबाद केले तर मॅट हेन्रीला फार सुरेख चेंडू टाकत त्रिफळाचित करीत पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला.

न्यूझीलंडची शेवटच्या फळीतले फलंदाज

न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुक नाबाद आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा हा भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. रवींद्र जडेजाला दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्सचे यश मिळाले. याशिवाय रवी अश्विनने 3 फलंदाजांना आपले बळी बनवले. आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदरने 1-1 विकेट घेतली. आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे 15 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारतीय संघाची पहिली इनिंग

याआधी भारताने दुसऱ्या दिवसाच्या 4 बाद 84 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी ९६ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे भारतीय संघ अवघ्या 263 धावांवर बाद झाला.

ऋषभ पंत आणि शुभमनची शानदार भागीदारी

ऋषभ पंत ५९ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शुभमन गिलने 146 चेंडूत 90 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर भारतीय फलंदाजांची सतत पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्फराज खान एकही धाव न काढता चालता झाला. रवींद्र जडेजाने 14 धावा केल्या. तर रविचंद्रन अश्विनने ६ धावांचे योगदान दिले. आकाशदीप शून्यावर बाद झाला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

न्यूझीलंडची गोलंदाजांची

न्यूझीलंडसाठी भारतीय वंशाचा एजाज पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एजाज पटेलने 5 फलंदाजांना बाद केले. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी 1 बळी घेतला.

न्यूझीलंडची पहिली इनिंग

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या किवींची पहिली विकेट कॉन्वेच्या रूपाने लवकरच गेली, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार टॉम लॅथमला क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रचिन रवींद्रलासुद्ध वॉशिंग्टनने सेम बॉल टाकून त्रिफळाचित केले. त्यानंतर चालली रविंद्र जडेजाची जादू, आज जड्डूने 5 विकेट घेत किवींना जेरीस आणले.

WTC फायनलकरिता भारताला कसोटी जिंकणे आवश्यक

वानखेडेच्या ऐतिहासिक स्टेडियमवर सुरू असलेल्या या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला निश्चितच विजयासाठी खेळावे लागणार आहे, कारण WTC फायनलचे गणित जुळवण्यासाठी भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल. वानखेडेच्या पिचवर प्रथम फलंदाजी करणारा संघ सर्वाधिक विजयी झालेला आहे. तसेच, जसजसा वेळ जातो वानखेडेची पिच स्पीनर्सला खूप फायदा करते. फिरकीपटूंचा या पिचवर मोठा दबदबा आहे. आज भारताने नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते, परंतु यावेळीसुद्धा नशीबाने भारताला साथ दिली नाही

–

Web Title: Ind vs nz 3rd test 2nd day new zealand batsmen completely failed in front of indian spinners and nz team lead by 143 runs after losing 9 wickets in second innings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 10:40 PM

Topics:  

  • IND vs NZ 3rd Test
  • indian cricket team
  • New Zealand
  • Ravindra Jadeja
  • Shubman Gill
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

IND vs SL: १५ ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट मालिकेचे सामने कुठे पाहता येणार? JioHotstar नाही, तर ‘या’ चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण
1

IND vs SL: १५ ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट मालिकेचे सामने कुठे पाहता येणार? JioHotstar नाही, तर ‘या’ चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण

Shubman Gill Captaincy Record: शुभमन गिलचा कर्णधार म्हणून कसा आहे रेकॉर्ड? आता श्रीलंका दौऱ्यात होणार ‘अग्निपरीक्षा’!
2

Shubman Gill Captaincy Record: शुभमन गिलचा कर्णधार म्हणून कसा आहे रेकॉर्ड? आता श्रीलंका दौऱ्यात होणार ‘अग्निपरीक्षा’!

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?
3

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?

IND vs SL: अरे देवा! शुभमन गिलला दुखापत, भारतीय टीमचा कर्णधार बदलला; सराव सामन्यातून बाहेर
4

IND vs SL: अरे देवा! शुभमन गिलला दुखापत, भारतीय टीमचा कर्णधार बदलला; सराव सामन्यातून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.