Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज

AbhiShek Sharma Topples Ishan kishan in icc T20 ranking: आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अभिषेक शर्माने ईशान किशनला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 28, 2026 | 04:52 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ICC च्या ताज्या रँकिंगमध्ये खळबळ
  • T20 चा नंबर १ फलंदाज बनला अभिषेक शर्मा
  • ईशान किशनला टाकलं मागे
Abhishek Sharma : आयसीसीच्या ताज्या टी-२० रँकिंगमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत धुमाकूळ घातला आहे. आता अभिषेकने आयसीसी टी-२० क्रमवारीत ईशान किशनकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. अभिषेकने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात, अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ताबडतोब खेळी करत शतक झळकावले. शतक झळकावल्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. त्याने ईशानला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर कब्जा केला. यावर्षी जुलैमध्ये ईशानने अभिषेकला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले होते, पण आता भारतीय फलंदाजांमधील अव्वल स्थानाच्या लढतीत पुन्हा एकदा बाजी पलटली आहे.

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?

अभिषेक शर्माची शानदार कामगिरी

वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्माने धडाकेबाज खेळी केली. त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये आपले दमदार शतक पूर्ण केले आणि ३८ चेंडूंमध्ये ११३ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून मालिका जिंकली.

या प्रभावी कामगिरीचा परिणाम आता ताज्या आयसीसी क्रमवारीत दिसून आला आहे. अभिषेकने आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. यापूर्वी, जुलै २०२५ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मागे टाकून पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते. मात्र, या वर्षी जुलैमध्ये आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर ईशान किशनने त्याला मागे टाकले होते. आता न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून अभिषेकने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

ईशान किशन दोन स्थानांनी घसरला

दुखापतीमुळे दोन टी-२० सामने खेळू न शकल्याने ईशान किशन दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान एका स्थानाने पुढे जात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या अव्वल १० क्रमवारीत चार भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यर ५ स्थानांनी घसरून ९व्या स्थानावर आला आहे. तिलक वर्मा १०व्या स्थानावर कायम आहे. आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या अव्वल १० क्रमवारीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूक, जोस बटलर आणि फिल सॉल्ट या तीन फलंदाजांचा समावेश आहे. कर्णधार ब्रूक चौथ्या स्थानावर, बटलर पाचव्या तर सॉल्ट सातव्या स्थानावर आहे.

Breaking Neeraj Yadav Death: क्रीडाविश्वात खळबळ! एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला 3 गोल्ड जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा मृत्यू

Web Title: Abhishek sharma become icc t20 rankings no 1 batsman overtakes ishan kishan pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • ICC Rankings
  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?
1

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला
2

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात
4

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.