Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका

IND vs NZ NZ beat India by 7 Wickets 5 th 20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 01, 2026 | 05:49 PM
NZ beat India by 7 Wickets 5 th 20

NZ beat India by 7 Wickets 5 th 20

Follow Us
Follow Us:
  • शेवटच्या लढतीत न्यूझीलंडचा धमाका
  • भारताला नमवलं, पण मालिका जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण
  • टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा
IND vs NZ 5 T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज खेळला गेला. हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांच ८ विकेट्स गमावून १९१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १८ षटकांत ३ विकेट्स गमावून १९५ धावा ठोकल्या. न्यूझीलंडने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. परंतु. भारतीय संघाने ही मालिका ३-२ ने जिंकली.

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक

शेवटच्या सामन्यात भारताचा दारुण पराभव

१९२ धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. फिन ॲलन अवघ्या दोन धावांवर बाद झाला. सलामीवीर आणि यष्टीरक्षक टिम सेफर्टने ५० चेंडूंमध्ये ११ चौकार आणि पाच षटकारांसह १८६ च्या स्ट्राईक रेटने ९३ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिचेलने २९ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सनेही या सामन्यात शानदार खेळी केली.

ग्लेन फिलिप्सने ३८ चेंडूंमध्ये नाबाद ६५ धावांची खेळी केली. बेवन जेकब्सनेही अखेरीस १ धाव काढली, ज्यामुळे न्यूझीलंडला अवघ्या १८ षटकांत ७ विकेट्स राखून सामना जिंकला. परंतु, त्यानंतर न्यूझीलंडने ही मालिका २-३ ने गमावली. भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.

भारताची फलंदाजी फ्लॉप

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा अपयशी ठरले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनने ३२ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. या खेळीत त्याने १९०.६२ च्या स्ट्राईक रेटने ५ षटकार आणि ५ चौकार मारले. त्यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यरने २३ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. तिलक वर्मानेही निराशाजनक कामगिरी केली.

तिलक वर्मा बाद झाल्यानंतर, नमन धीरने २३ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने १७ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. परिणामी, भारतीय संघ २० षटकांत ८ विकेट्स गमावून केवळ १९१ धावाच करू शकला. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने ४ विकेट्स घेतले. नॅथन स्मिथ आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी २ विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. जेकब डफी आणि मिचेल सँटनर यांना एकही विकेट मिळाला नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश रेड्डी, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना कोणी जिंकला?

    Ans: न्यूझीलंडने भारताचा ७ विकेट्सने पराभव करत शेवटच्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

  • Que: भारत- न्यूझीलंड टी-२० मालिका कोणी जिंकली?

    Ans: भारतीय संघाने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली.

  • Que: पाचव्या टी-२० सामन्यात भारताने किती धावा केल्या?

    Ans: भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य होते.

Web Title: Ind vs nz 5th t20 new zealand beat india by 7 wickets pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस
1

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं
3

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य
4

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.