Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs NZ ODI series Schedule 2026: एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सीरीज कधी, केव्हा आणि कुठे रंगणार, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 01, 2026 | 03:29 PM
IND vs NZ ODI series

IND vs NZ ODI series

Follow Us
Follow Us:
  • हिटमॅन-कोहलीची जोडी पुन्हा जमणार
  • वनडे मालिकेपूर्वी दोघांचा कसून सराव
  • न्यूझीलंडविरुद्ध कधी, कुठे रंगणार वनडे सामने?
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. भारताने ही मालिका आधीच ३-१ ने खिशात घातली आहे. टी-२० मालिका संपताच, अवघ्या तीन दिवसांनी एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी, भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कधी आणि केव्हा रंगणार एकदिवसीय मालिकेचा थरार, जाणून घेऊयात.

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य

रोहित शर्मा-विराट कोहली न्यूझीलंडला पोहोचले

रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी ऑकलंडमध्ये तयारीला सुरुवात केली. त्यांच्या नेट सरावाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात दोघेही कसून तयारी करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये रोहित आणि विराट हसतानाही दिसत आहेत. दोघेही न्यूझीलंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असून दीर्घकाळ सराव करत आहेत.

रोहित आणि विराट कधी खेळणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑकलंडमधील ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसतील. दोन्ही संघ ११ दिवसांच्या कालावधीत पाच एकदिवसीय सामने खेळतील. रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या तंदुरुस्त असून संपूर्ण पाच सामन्यांसाठी उपलब्ध आहेत. काही खेळाडू पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांनंतर कसोटी मालिकेची तयारी सुरू करतात. परंतु, रोहित आणि विराट यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून ते चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघासोबत राहतील.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना, ४ नोव्हेंबर २०२६, (ईडन पार्क, ऑकलंड)
  • दुसरा एकदिवसीय सामना ७ नोव्हेंबर, २०२६, (स्काय स्टेडियम, वेलिंग्टन)
  • तिसरा एकदिवसीय सामना: १० नोव्हेंबर, २०२६, (सेडन पार्क, हॅमिल्टन)
  • चौथा एकदिवसीय सामना: १३ नोव्हेंबर २०२६, (बे ओव्हल, माउंट माउंगानुई)
  • पाचवा एकदिवसीय सामना : १५ नोव्हेंबर २०२६, (बे ओव्हल, माउंट माउंगानुई)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना १५ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू होईल. दोन्ही संघामध्ये दोन कसोटी सामने खेळले जातील. भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकली असून, आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकण्याचेही त्यांचे ध्येय असेल.

PAK vs SL: फखर जमानचा मैदानात धुमाकूळ! श्रीलंकेचा सुपडा साफ करत पाकिस्तानने जिंकली ट्राय सीरिज; भारताच्या विक्रमाशी बरोबरी

Web Title: Ind vs nz odi series 2026 rohit sharma virat kohli full schedule pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • ODI Series
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं
1

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य
2

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा
3

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report
4

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.