Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN? पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११

Ind A vs Pak A india playing 11 probable: आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' संघ भिडणार आहेत.या सामन्यात कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 21, 2026 | 05:48 PM
Ind A vs Pak A

Ind A vs Pak A

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तान भिडंत रंगणार
  • वैभव-अभिषेकवर नजर
  • प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी?
IND A vs PAK A: भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघ यांच्यात रविवार २२ नोव्हेंबर रोजी महामुकाबला होणार आहे. हे दोन्ही संघ आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी खेळलेल्या सामन्यात, भारताने नेपाळला, तर पाकिस्तानने युएईला पराभूत केले. दोन्ही संघ ‘ब’ गटात अव्वल दोन स्थानांवर आहेत. रविवारच्या महासंग्रमात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. या सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग ११ कशी असेल, जाणून घेऊयात. (IND vs PAK)

IND vs NZ: ना धोनी, ना गिलख्रिस्ट Rishabh Pant ठरला बॉस! एका खेळीत मोडले दोन रेकॉर्ड्स; WTC मध्येही रचला इतिहास

पाकिस्तानविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

नेपाळविरुद्ध ३०६ धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर, भारत अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात करू शकतात. मागील सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आयुष बडोनी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. परंतु, बडोनीला आणखी एक संधी मिळू शकते. व्यवस्थापनाच्या इच्छेनुसार, त्याच्या जागी प्रभसिमरन सिंगला संघात स्थान दिले जाऊ शकते. कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी मागील सामन्यात शतके झळकावली होती. पाकिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

खालच्या फळीत रिंकू सिंग आणि सूर्यांश शेडगे फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. हर्षित राणा आणि प्रिन्स यादव वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. गेल्या सामन्यात हर्षितने चार आणि प्रिन्स यादवने पाच विकेट्स घेतले होते. शहबाज अहमदनेही एक विकेट घेतला होता. विपराज निगमला गोलंदाजीने योगदान देण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे, त्याला पाकिस्तान ‘अ’ संघाविरुद्धही खेळण्याची संधी मिळू शकते.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होईल?

पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ यांच्यात एक रोमांचक सामना अपेक्षित आहे. या प्रमुख स्पर्धेचे सर्व सामने दोहा येथे होत आहेत. हा सामना वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे. चाहते टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर हा सामना थेट पाहू शकतात. हा सामना सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर देखील प्रसारित केला जाईल.

भारताची संभाव्य प्लेइंग ११ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी/प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव.

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' यांच्यात सामना कधी होणार आहे?

    Ans: भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' यांच्यातील सामना रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.

  • Que: भारत-पाकिस्तान सामना कुठे खेळवला जाणार आहे?

    Ans: हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

  • Que: भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होईल?

    Ans: हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे.

Web Title: Ind vs pak a india probable playing 11 rising stars asia cup pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Asia Cup Rising Stars
  • Asia Cup Rising Stars 2026
  • IND VS PAK
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर
1

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

India A vs Pakistan A: पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा Sunday! ‘आमच्यासाठी हा फक्त सामना…’, कर्णधार तिलक वर्माचं स्पष्ट मत
2

India A vs Pakistan A: पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा Sunday! ‘आमच्यासाठी हा फक्त सामना…’, कर्णधार तिलक वर्माचं स्पष्ट मत

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड
3

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव
4

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.