फोटो सौजन्य - ICC Cricket World Cup
भारत विरुद्ध पाकिस्तान : महिला विश्वचषकाचा कालचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आज आयसीसी विश्वचषक 2025 चा सहावा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यातील विश्वचषक सामना आज कोलंबो येथे खेळला जाणार आहे. सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल.
अलिकडेच, आशिया कप २०२५ मध्ये, भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आणि अंतिम सामन्यात त्यांना पराभूत करून विजेतेपद जिंकले.आता भारतीय महिला संघाची पाळी आहे, ज्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. गेल्या २० वर्षांत दोन्ही संघांनी ११ सामने खेळले आहेत आणि प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले आहे. यावेळीही भारतीय महिला संघाकडून विश्वचषकात पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक होण्याची अपेक्षा आहे. तर, चाहते भारत-पाकिस्तान महिला संघाचा हा लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकतात ते जाणून घेऊया.
IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक 2025 चा सहावा सामना हा 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे, हा सामना श्रीलंकेमध्ये कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे जिओहाॅटस्टारवर होणार आहे. तर टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक हा सामना स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकतात.
Two crucial #CWC25 points up for your grabs today in Colombo 🏏 All the broadcast details for #INDvPAK are available here 📺 https://t.co/3BqKJPeYJB pic.twitter.com/uOeSF0I7MV — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2025
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्रीचरणी, राधा यादव, अमनजोती कौर, अरविंद गोविंद, अरविंद गौतम
राखीव खेळाडू- तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा, मिन्नू मणी, सायली सातघरे
पाकिस्तान संघः फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली सिद्दीकी (उपकर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, आयमान फातिमा, नशरा सुंधू, नतालिया परवेझ, ओमामा सोहेल, रमीन शमीम, सदफ शमास, सादिया इक्बाल, शवाल झुल्फिकार, सिद्रा नवाज शाह, सिद्रा नवाज ए.
राखीव: गुल फिरोजा, नाझिहा अल्वी, तुबा हसन, उम्म-ए-हानी, वहिदा अख्तर