
IND vs SA 1st T20: 'Yorker King' wreaks havoc in world cricket! Bumrah becomes first Indian bowler to achieve 'this' feat
Jasprit Bumrah created history : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक मोठा टप्पा गाठला आहे. बुमराहने फक्त एका विकेटसह टी-२० मध्ये १०० बळी घेत इतिहास घवडला आहे. यासह, जसप्रीत बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० बळी घेण्याची किमया साधून, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरण्याचा मान पटकवला आहे.
हेही वाचा : Ind Vs SA: 6, 6, 6, 6…हार्दिक पंड्याची धुव्वाधार खेळी, केला ‘महारेकॉर्ड’, कारनामा करणारा 4 था भारतीय फलंदाज
जसप्रीत बुमराहच्या आधी अर्शदीप सिंगने टी-२० मध्ये १०० बळींचा टप्पा पार केला होता. अर्शदीप सिंगनंतर बूमराह हा भारतासाठी टी-२० मध्ये १०० बळी घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. जसप्रीत बुमराहने डेवॉल्ड ब्रेव्हिसला बाद करून विकेटची शंभरी गाठली आहे.
टी-२० मध्ये १०० बळी पूर्ण करून, जसप्रीत बुमराहने एका खास यादीत एंट्री केली आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारा तो जगातील पाचवा गोलंदाज बनला आहे. तो टिम साउदी, शकिब अल हसन, लसिथ मलिंगा आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्या पंक्तीत सामील झाला आहे. ज्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
मंगळवार, ९ डिसेंबर रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात, जसप्रीत बुमराहने ११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सामन्यातील पहिला बळी टिपला. त्याने देवाल्ड ब्रेव्हिसला माघारी पाठवले. सूर्यकुमार यादवने त्याचा झेल घेतला. नंतर त्याच षटकात, बुमराहने आणखी एक बळी टिपला. ११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ब्रेव्हिसची विकेट घेतल्यानंतर, बुमराहने त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर केशव महाराजला देखील बाद केले. जसप्रीत बुमराहने तीन षटकात १७ धावा देत २ विकेट्स काढल्या.
हेही वाचा : IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ६ गडी गमावून १७५ धावा काढल्या. स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने २८ चेंडूत शानदार नाबाद ५९ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ७४ धावाच करता आल्या. भारताने हा सामना १०१ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.