Sanju Samson Created history by scoring Fastest Century
डर्बन : आज दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत टी-20 सामन्यात अफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. परंतुस सलामीवीर अभिषेक शर्मा लवकरच बाद झाला परंतु, दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनची जोरदार फटकेबाजी सुरुच होती. त्याने धमाकेदार फटकेबाजी करीत अवघ्या 50 चेंडूत 107 धावा ठोकल्या. त्याने उत्तुंग असे 10 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने शानदार शतक पूर्ण केले.
संजूची धमाकेदार खेळी
𝙈. 𝙊. 𝙊. 𝘿 Sanju ☺️ 💯
Drop an emoji in the comments below 🔽 to describe that knock
Scorecard ▶️ https://t.co/0OuHPYaPkm#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/P2JSe824GX
— BCCI (@BCCI) November 8, 2024
संजू सॅमसनची शानदार फटकेबाजी
भारताची पहिली विकेट लवकर गेल्यानंतरसुद्धा संजू सॅमसने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने मिडऑन, कव्हर, स्लीपला शानदार छक्के ठोकत अफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढला. संजू लागोपाठ दोन शतके ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया द. अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. टी-20 चा भारतीय संघ पूर्णपणे वेगळा आहे. संजू सॅमसनच्या फलंदाजीवर कायम शंका घेणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर आहे.
संजूने बांगलादेश विरुद्ध दसऱ्याची खेळी अविस्मरणीय
नवरात्रीच्या शेवटच्या रात्री म्हणजेच विजयादशमीला संजूने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करीत चाहत्यांना खूश केले. विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर जणू संजू दुर्गोत्सव करतोय असे भासत होते. त्याने बांगलादेश गोलंदाजांना चोपून काढले. एकाच ओव्हरमध्ये सलग पाच षटकार ठोकत बांगलादेशला हैराण करून सोडले.
संजू सॅमसनने लागोपाठ ठोकले दुसरे शतक
मागच्या महिन्यात नवरात्रीत, हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संजूने इतिहास रचला. बांगलादेशी गोलंदाजांना फोडून काढत राजीव गांधी स्टेडियमवर षटकारांची बरसात केली. नवरात्रीला जणू संजूमध्ये दुर्गा आलीये असेच वाटत होते. त्याने रिशाद हुसेनला मारलेले लागोपाठ 5 षटकार पाहण्याजोगे होते. काही केल्या बांगलादेशी गोलंदाजांना संजू ऐकत नव्हता. त्याने सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम स्वतःच्यानावावर केला.
युवराज सिंहचा विक्रम अबाधित
नवरात्रीत बांगलादेशी गोलंदाजांना धुवून काढत संजूने नवीन विक्रम आपल्या नावावर केला. संजू सॅमसनने आज अनेक रेकाॅर्ड केले तरी युवराज सिंहचा विक्रम अबाधित राहिला. एकाच षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम तसाच राहिला कारण संजूने पाच षटकार ठोकले, पहिला चेंडू ड्रॉ गेल्याने 5 चेंडू त्याने मैदानाबाहेर पाठवले. त्याने रिशादला मारलेले 5 षटकार देखण्याजोगे होते.