
IND vs SA 4th T20I: BCCI finally admits its mistake regarding the Lucknow T20 match! Will take care regarding the schedule of upcoming series.
IND vs SA 4th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी लखनौ येथे चौथा टी२० सामना खेळला जाणार होता. परंतु, धुक्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. यामुळे अटल बिहारी स्टेडियमवर जमलेले हजारो चाहत्यांच्या हात निराशा आली. या प्रकरणावर आता बीसीसीआयने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने अप्रत्यक्षपणे आपली चूक मान्य केल्याचे दिसत आहे. माध्यमांशी बोलताना, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, भविष्यात ते उत्तर भारतातील हवामान लक्षात घेऊन स्पर्धा आणि मालिका सामने वेळापत्रकबद्ध करण्याचा विचार करणार आहेत. सामना रद्द झाल्यामुळे चाहते खूप नाराज होऊन त्यांनी बीसीसीआयवर टीका देखील केली होती.
हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर
एएनआयशी संवाद साधत असताना शुक्ला म्हणाले की, लखनौ टी२० रद्द झाल्यामुळे चाहते नाराज आहेत. त्यांनी असे आश्वासन दिले की बीसीसीआय आता टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळापत्रकाचा आढावा घेऊन, १५ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान होणारे सामने उत्तर भारताऐवजी पश्चिम भारतात होणार आहेत. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या काळामध्ये उत्तर भारतात प्रचंड थंडी असते आणि धुक्यामुळे अनेकदा दृश्यमानता देखील कमी झालेली असते.
राजीव शुक्ला पुढे म्हणाले की, “धुक्यामुळे सामना रद्द करावा लागला आहे. लोक खूप संतापलेले होते. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीतील सामन्यांच्या वेळापत्रकाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. उत्तर भारताऐवजी ते पश्चिम भारतात हलवण्याबाबत विचार करावा लगाणार आहे. देशांतर्गत सामन्यांवर देखील धुक्याचा परिणाम झाला आहे; ही एक गंभीर बाब आहे.”
बीसीसीआयने टी२० मालिकेच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष केलेले दिसून आले. परिणामी, लखनौमधील चाहत्यांना याचा फटका बसला आणि त्यांना टी२० सामना पाहण्याची संधी मिळाली नाही. तिकिटांवर हजारो रुपये खर्च करणाऱ्या चाहत्यांना त्यांचा पूर्ण परतावा मिळणार नाही त्यामुळे चाहते नाराज आहेत. बुकिंग शुल्क वजा केल्यानंतरच त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.