
IND vs SA 5th T20I: Ahmedabad - Explosive innings from Hardik and Tilak! India sets a target of 232 runs for South Africa.
IND vs SA 5th t20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर 5 बाद 231 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आता 232 धावा कराव्या लागणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला
सामन्याआधी कर्णधार एडन मार्करामने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारतीय फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताच्या डावाची सुरवात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी केली. भारताची सुरुवात दमदार झाली. अभिषेक शर्मा आणि सॅमसनने पहिल्या विकेट्ससाठी 63 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 21 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर सॅमसनने आपला खेळ सुरूच ठेवला. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक फटके मारले. दरम्यान सॅमसन 37 धावा करून बाद झाला. त्याने 22 चेंडूत 37 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. सॅमसन बाद झाल्यावर मैदानात हार्दिक नावाचे वादळ आले आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला. एका बाजूने तिलक आणि दुसऱ्या बाजूने हार्दिक फटके लगावत होता. दोघांनी अर्धशतके पूर्ण केली.
हार्दिकने 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर दुसरीकडे तिलकनेही आपले अर्धशतक लगावले. या दोघांनी 105 धावांची भागीदारी रचली. हार्दिक 25 चेंडूत 63 धावांची खेळी केली आणि तो बाद झाला. त्याने तेच्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबेने चांगली फटकेबाजी केली. तिलक 42 चेंडूत 73 धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 21 षटकार लगावला. दुबे 10 धावा तर जितेश शर्मा 0 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जॉर्ज लिंडे आणि ओटनील बार्टमन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताचा संघ : अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, वॉशिंग वॉशिंगटन, जसप्रीत बूमराह
दक्षिण आफ्रिकेचा संघ :क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (क), डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन
बातमी अपडेट होत आहे….