
IND vs SA 5th T20I: South Africa won the toss and elected to bowl.
IND vs SA 5th t20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना आणि शेवटचा T20I सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सामन्या आधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. भारतीय संघात शुभमन गिल असणार नाही. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली असून तो अभिषेक शर्मासोबत सलामीला येणार आहे.
टॉस जिंकल्यावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम म्हणाला की “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेटवर बऱ्यापैकी दव दिसत आहे, कदाचित नंतर आणखी दव पडेल आणि चेंडू अधिक चांगल्या प्रकारे बॅटवर येईल. खेळण्यासाठी सर्व काही आहे, लक्ष विश्वचषकावर आहे आणि आम्हाला येथे बरेच सामने खेळायचे आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत बरीच चांगली चिन्हे दिसत आहेत, दौरा सकारात्मकतेने संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नॉर्खियाच्या जागी लिंडे खेळत आहे.”
टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. विकेट चांगली दिसत आहे, दव पडणार नाही आणि आम्हाला धावसंख्या उभारून घ्यायची आहे. स्टेडियम जवळपास पूर्ण भरले आहे. या सामन्यातून आपल्याला काय हवे आहे ते पाहूया, होय मालिका पणाला लागली आहे, पण हे स्वतःला सिद्ध करण्याबद्दल आणि खेळाचा आनंद घेण्याबद्दल आहे. हर्षितच्या जागी बुमराह, कुलदीपच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि गिलला लखनौमध्ये किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसन खेळत आहे.”
भारताचा संघ : अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, वॉशिंग वॉशिंगटन, जसप्रीत बूमराह
दक्षिण आफ्रिकेचा संघ :क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (क), डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन