
IND vs SA 5th T20: The ball hit by Hardik struck a cameraman! Gautam Gambhir's heart skipped a beat and...; VIDEO VIRAL
Gautam Gambhir’s reaction : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-१ अशी जिंकली. या विजयात हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी शानदार खेळीच्या जोरावर ५ बाद २३१ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिका संघाला २० षटकात २०१ धावाच करता आल्या. यासामन्यात स्फोटक खेळी करत २५ चेंडूत ६३ धावा केल्या, तर तिलकने ४२ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या दरम्यान, हार्दिकने त्याकया खेळीच्या दरम्यान षटकरांची आतिषबाजी केली. या सामन्यात हार्दिक मारलेला एक षटकार थेट कॅमेरामनच्या हातवर जाऊन लागला, ज्यामुळे त्याला वेदना झालेल्या दिसून आल्या. कॅमेरामन जखमी झाल्याचे पाहून डगआउटमध्ये बसलेल्या भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.
कॅमेरामनला दुखापत झाल्यावर, गंभीरकडून ताबडतोब त्याच्या फिजिओंना कॅमेरामनकडे जाण्याची आणि गंभीर दुखापत झाली नाही याची खात्री करण्याची सूचना करण्यात आली. भारतीय संघाने प्रशिक्षक गौतम गंभीरच्या या हावभावाने कॅमेरामनचे मन जिंकून घेतलं आहेत. सोशल मीडियावर केवळ कॅमेरामनच नाही तर चाहते देखील गंभीरच्या या कृतीचे कौतुक करताना दिसत आहेत.
एक गोष्ट उएललेखणीय आहे की, भारताचा डाव संपल्यानंतर, हार्दिक मैदानात परतला आणि कॅमेरामनकडे गेला. त्याच्या खेळीदरम्यान हार्दिकने जखमी झालेल्या कॅमेरामनची भेट देखील घेतली आहे. त्याने त्याच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली आणि त्याला मिठीही मारली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद २३१ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात दक्षिण आफ्रिका संघ २० षटकात २०१ धावाच करू शकला. परिणामी भारतीय संघाने हा सामना ३० धावांनी जिंकला आणि मालिका ३-१ अशी जिंकली.