हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya has made history : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवट भारताच्या विजयाने झाला. पाचव्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २३१ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावाच करू शकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करून भारताने या मालिकेवर ३-१ असा कब्जा केला. या सामन्यात, भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इतिहास घडवला आहे. हार्दिक पंड्याने पाचव्या सामन्यात अर्धशतक झळकावत टी-२० मध्ये २००० धावा पूर्ण केल्या. यासह, तो टी-२० मध्ये २००० धावा आणि १०० विकेट घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू बनला. हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरला.
हार्दिक पंड्याला २००० धावा पूर्ण करण्यासाठी ६१ धावांची आवश्यकता होती. पंड्याने पाचव्या सामन्यातील डावाच्या १९ व्या षटकात हा कारनाम केला. पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ५ चौकार आणि ५ षटकार मारून ६३ धावांची खेळी साकारली. या कामगिरीसह, तो टी-२० मध्ये २००० धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला आहे.
भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. रोहितने सप्टेंबर २००७ ते जून २०२४ पर्यंत १५९ टी-२० सामने खेळले असून त्याने यामध्ये एकूण ४२३१ धावा केल्या आहेत. रोहितनंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो, ज्याने जून २०२४ मध्ये आपली टी-२० कारकिर्दीचा शेवट केला. कोहलीने भारतासाठी १२५ टी-२० सामने खेळले आणि त्यामध्ये ४१८८ धावा फटकावल्या.
हार्दिक पंड्या २००० धावा आणि १०० विकेट्सचा टप्पा गाठणारा जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. हार्दिक पंड्याने १२४ सामन्यांमध्ये २००२ धावा काढल्या आहेत. या दरम्यान त्याने ७ अर्धशतके देखील झळकवली आहेत. पंड्याने टी-२० सामने १५१ चौकार आणि १०६ षटकार मारले आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने १०१ विकेट्स देखील घेतल्या आहेत. हार्दिक पंड्या २००० धावा आणि १०० विकेट्स घेणाऱ्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
शाकिब अल हसन हा पहिला फलंदाज आहे, ज्याने शाकिब अल हसनने १२९ टी-२० सामन्यांमध्ये २,५५१ धावा फटकावल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीमध्ये १४९ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात १३ अर्धशतक झळकवले आहेत. मोहम्मद नबीने १४५ टी-२० सामन्यांमध्ये २,४१७ धावा केल्या आहेत, त्याने १०४ विकेट्स देखील घेतल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतकांचा समावेश आहे.






