
IND vs SA T20I series: Surya Army ready to face South Africa! Know A to Z information about the first match
IND vs SA T20I series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून ५ सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात येणार आहे. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेला तीन एकदिवसीय सामन्यात पराभव केला. भारताने २-१ अशी मालिका जिंकली आहे. आता भारत या टी २० मालिकेत देखील आपला दबदबा दाखवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. शुभमन गिल आणि हार्दिक पंड्याच्या पुनरागमनामुळे बळकट झालेला सध्याचा टी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याने पुढील वर्षीच्या टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही मालिका फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारताच्या औपचारिक तयारीची सुरुवात आहे. भारतीय संघ विश्वचषकापूर्वी १० टी-२० सामने खेळेल. आफ्रिकेनंतर, ते न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका देखील खेळतील. भारत विश्वचषकात आपला पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध खेळेल.
हेही वाचा : हार्दिक पांड्याने पपाराझींना धरलं धारेवर, गर्लफ्रेंडचा घाणरेडा व्हिडिओ काढल्यामुळे संतापला! पहा Post
भारतीय संघ या दोन्ही मालिकांमध्ये स्पष्ट दृष्टिकोन ठेवून प्रवेश करेल, ज्याचे मुख्य ध्येय खेळाडूंच्या भूमिका निश्चित करणे आणि विश्वचषकापूर्वी योग्य संयोजन तयार करणे आहे. गेल्या वर्षी विश्वचषक जिंकल्यापासून, भारताने टी-२० मध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सलग आठ सामने जिंकून विश्वचषक जिंकला. तेव्हापासून, भारताने त्यांची विजयी मालिका २६ सामन्यांपर्यंत वाढवली आहे, ज्यामध्ये आशिया कपमधील सलग सात विजयांचा समावेश आहे. या काळात, भारतीय संघाने फक्त चार सामने गमावले आहेत. या काळात, भारतीय संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही आणि आता टी-२० विश्वचषक अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाविरुद्ध आपली आघाडी आणखी मजबूत करण्याचे ध्येय ठेवेल.
हेही वाचा : AUS vs ENG : इंग्लडला मोठा धक्का! अॅशेस मालिकेतून प्रमुख खेळाडू झाला बाहेर, या खेळाडूला मिळाले संघात स्थान
दुखापतीनंतर पुन्हा मैदानात मानेच्या कडकपणामुळे कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर शुभमन गिल पुन्हा मैदानात उतरत आहे. ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २९.८९ च्या सरासरीने ८३७ धावा काढणाऱ्या गिलसाठी, आयसीसी स्पर्धेसाठी चागली तयारी करण्यासाठी ही मालिका त्याव्यासाठी महत्त्वाची आहे. डावखुरा फलंदाज अभिवेक शर्माने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत, ५०.६६ व्या सरासरीने आणि २४९ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ३०४ धावा केल्या, ज्यामध्ये बंगालविरुद्ध ५२ चेडूत १४८ धावांचा समावेश होता.
तसेच भारतासाठी महत्वाचे हार्दिक पंड्याचे पुनरागमन भारतासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. आशिया कप दरम्यान क्वाड्रिसेप्सव्या दुखापतीमुळे दोन महिन्यांहून अधिक काळ बाहेर होता. या अष्टपैलू खेळाडूने मुश्ताक अली ट्रॉफीमधील सामन्यात बडोद्यासाठी ४२ चेंडूत ७७ धावा काढत आणि नंतर चार षटकांत ५२ धावा देत एक विकेट घेत शानदार पुनरागमन केले. हार्दिक संघाच्या इतर खेळाडूंच्या एक दिवस आधी येथे आला आणि बाराबती स्टेडियमवर एकट्याने सराव केला, त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला आवश्यक संतुलन मिळेल.
भारत T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सनदार.
दक्षिण आफ्रिका T20 संघ : एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅन्सन, क्विंटन डी कॉक, डोनोव्हान फरेरा, ॲनरिक नॉर्टजे.