फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Hardik Pandya Instagram Post : हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट झाल्यानंतर तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या घटस्फोटानंतर सोशल मिडिया महिका शर्मा हिच्यासोबत फोटो शेअर करुन नात्याचा कबुली दिली होती. महिका शर्मा हिने देखील बऱ्याचदा सोशल मिडियावर पोटो शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या सध्या कटकमध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेत तो खेळताना दिसणार आहे.
आता सोशल मिडियावर आणखी एकदा पोस्ट व्हायरल होत आहे. त्याने यामध्ये त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा हिची बाजू घेताना दिसला आहे. याचे कारण म्हणजेच मुंबईमधील पपाराझी. पपाराझींनी एक महिका शर्मा हिची हाॅटेलमधून बाहेर येतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता. यामध्ये तिचा व्हिडिओ खराब अॅंगलने घेतला होता त्यानंतर सोशल मिडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आता सोशल मिडियावर एक पोस्ट हार्दिक पांड्याने केली आहे ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, मला समजते की लोकांच्या नजरेत जगणे त्यामुळे लक्ष असणे आणि बारकाईने पाहणे, ते मी निवडलेल्या जीवनाचा एक भाग आहे. पण आज असे काहीतरी घडले जे एका मर्यादेच्या पलीकडे गेले. माहिका वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये जिना उतरत असताना पापाराझींनी तिला अशा अॅगलमधून टिपण्याचा निर्णय घेतला ज्या अॅगलमधून कोणत्याही महिलेचा फोटो काढू नये. एका खाजगी क्षणाचे रूपांतर स्वस्त सनसनाटीमध्ये झाले.
🚨 INSTAGRAM STORY OF HARDIK PANDYA 🚨 pic.twitter.com/7XDRC5JodD — Johns. (@CricCrazyJohns) December 9, 2025
हे कोणी काय क्लिक केले याबद्दल नाही, तर ते मूलभूत आदराबद्दल आहे. महिलांना सन्मान मिळायला हवा. प्रत्येकाला मर्यादा हव्या आहेत. दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या मीडिया बांधवांना मी तुमच्या कामाचा आदर करतो आणि नेहमीच सहकार्य करतो. पण मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपया थोडे अधिक जागरूक रहा. प्रत्येक गोष्ट टिपण्याची गरज नाही. प्रत्येक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. चला या खेळात थोडी माणुसकी ठेवूया. धन्यवाद. सध्या हि पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्या आशिया कप 2025 च्या फायनलच्या सामन्याआधी जखमी झाला होता. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला आहे. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेमध्ये तो भारतीय संघासाठी पुनरागमन करताना दिसणार आहे. मागील काही सामन्यामध्ये त्याने कमालीची कामगिरी आणि फाॅर्म दाखवला आहे. त्याच्या आगामी सामन्यामधील मालिकेवर चाहत्यांची नजर असणार आहे.






