फोटो सौजन्य - सोशल मिडिया
इंग्लंड संघाची सुरु असलेल्या अॅशेस मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेचे आतापर्यत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधील पराभवानंतर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे संपूर्ण अॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे, त्यामुळे त्याच्या आणखी अडचणी वाढल्या आहेत.
पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मार्क वूडला डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि आता तो उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे, ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १७ डिसेंबर रोजी अॅडलेड येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (England Cricket Mark Wood Rulled Out) दुखापतीमुळे उर्वरित अॅशेस सामन्यांमधून बाहेर पडला आहे. वूड या आठवड्याच्या अखेरीस मायदेशी परतेल, जिथे तो ईसीबी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याची पुनर्प्राप्ती आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू ठेवेल.
Absolutely gutted for you, Woody. After working so hard to get back, we’re all with you ❤️ — England Cricket (@englandcricket) December 9, 2025
मार्क वूडच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) वरिष्ठ संघात वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशरचा समावेश केला आहे. फिशर अलीकडेच इंग्लंड लायन्ससोबत ऑस्ट्रेलियात होता आणि आता तो अॅशेस मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंड संघात सामील झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड मालिकेतून बाहेर पडल्यानंतर मार्क वूडला संपूर्ण अॅशेस मालिकेतून वगळण्यात आल्याची बातमी आली आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघालाही मोठा धक्का बसला आहे. जोश हेझलवूडलाही संपूर्ण अॅशेस मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.
तिसरी कसोटी: १७-२१ डिसेंबर, अॅडलेड ओव्हल
चौथी कसोटी: २६-३० डिसेंबर, एमसीजी, मेलबर्न
पाचवी कसोटी: ४-८ जानेवारी, एससीजी, सिडनी
२०२५ साठी इंग्लंडचा अद्ययावत अॅशेस संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रुक (उपकर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), जोश टंग, मॅथ्यू फिशर.






