Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: भारताने लंकेचे केले दहन! 165 धावांनी मिळवला विजय, मानव सुथारची जादू

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यावर भारताने आपला झेंडा रोवला आहे. श्रीलंकेला 165 धावांनी हरवून खिशात सामना घातला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 19, 2026 | 01:42 PM
IND vs SL: मानव सुथारची जादू, भारताने मिळवला श्रीलंकेवर विजय (फोटो सौजन्य - Instagram)

IND vs SL: मानव सुथारची जादू, भारताने मिळवला श्रीलंकेवर विजय (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारताने १६५ धावांनी श्रीलंकेला लोळवले
  • पहिल्या कसोटीवर घेतला कब्जा, १-० ने सिरीजमध्ये आघाडी 
  • मानव सुथारची जबरदस्त कामगिरी 
IND vs SL: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकत लंकेत जाऊन श्रीलंकन संघाचे दहन केले आहे. या विजयामुळे भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी मानव सुथारने शेवटचे चार बळी घेतले आणि हा सामना भारतासाठी फिरवला. त्याने प्रथम एकाच षटकात तीन बळी आणि त्यानंतर पुढच्याच षटकात एक बळी घेऊन भारतासाठी सामना निश्चित केला. 

Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड

गॉल कसोटीत भारतीय संघ आणि श्रीलंका एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्याचा निकाल शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात लागला. भारतीय संघाने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने ३७२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ अवघ्या २०६ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात भारताकडून मानव सुथारने ६ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाने २ बळी घेतले. श्रीलंकेकडून सोनल दिनुशाने दुसऱ्या डावात ८४ धावांची खेळी केली. गॉल कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेने ६ गडी गमावले.

श्रीलंकेच्या टीमला गुंडाळले

तत्पूर्वी, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने श्रीलंकेच्या चार विकेट्स घेतल्या होत्या. ३७२ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवत दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. मानव सुथारने शेवटच्या दिवशी शानदार गोलंदाजी करत सहा विकेट्स घेतल्या.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर

गॉल कसोटीतील विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला मोठी बढती मिळाली आहे. १० सामन्यांमधून पाच विजय, चार पराभव आणि एक बरोबरीसह ६४ गुण आणि ५३.३३ टक्केवारीसह भारत आता सध्याच्या WTC चक्रात पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर भारताच्या पुढे आहेत. या पराभवामुळे, पाच सामन्यांमधून एक विजय, दोन पराभव आणि दोन बरोबरीसह श्रीलंका भारताच्या खाली सहाव्या स्थानावर घसरला आहे.

भारताचा विजय चौथ्या दिवशीच निश्चित झाला होता.

भारताने आपल्या पहिल्या डावात ४६२ धावा केल्या आणि श्रीलंकेला २८४ धावांवर बाद करून १७८ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. भारताने आपल्या दुसऱ्या डावात १९३ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर ३७२ धावांचे अशक्य लक्ष्य ठेवले. गॉलमध्ये इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यापूर्वी कधीही झाला नसल्यामुळे भारताचा विजय निश्चित मानला जात होता.

IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर

Web Title: Ind vs sl 1st test live updates india lead 1 0 vs sri lanka series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Manav Suthar
  • Test Match

संबंधित बातम्या

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम
1

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री
2

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
3

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.