Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

IND vs SL Semi Final : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुष क्रिकेटच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेवर मात करत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ईशान किशनच्या नाबाद 80 धावांच्या जोरावर भारताने 169 धावा उभारल्या होत्या. आता सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज फायनल रंगणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2026 | 12:48 PM
श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेला नमवत भारत फायनलमध्ये!
  • आता सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तान महामुकाबला
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत रंगणार भारत-पाकिस्तान फायनल
IND vs SL Semi Final : जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दमदार कामगिरी करत भारताने सुवर्णपदकाच्या लढतीचे तिकीट निश्चित केले. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (IND vs SL Semi Final)

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला श्रीलंकेचा संघ अवघ्या 9.5 षटकांत 45 धावांवर गारद झाला. ईशान किशनने 46 चेंडूंत नाबाद 80 धावांची शानदार खेळी करत डाव सावरला. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार लगावले. वैभव सूर्यवंशीनेही 21 चेंडूंत 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अंतिम फेरीत धडक

भारताने गुरुवारी झालेला हा सामना तब्बल 124 धावांनी जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. हा सामना 3 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. पाकिस्तानने गुरुवारीच झालेल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

World Cup 2027: आज कधी आणि कुठे करणार ICC वर्ल्ड कप 2027 च्या वेळापत्रकाची घोषणा, भारतीय टीम सज्ज

170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक मारा होता. मात्रजसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दोन विकेट घेत श्रीलंकेला दुहेरी धक्का दिला. त्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला.

आता पाकिस्तानशी हायव्होल्टेज सामना

दुसरीकडे, पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सुवर्णपदकाचा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. भारत हा पुरुष क्रिकेटमधील गतविजेता आहे. 2023 च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे यंदाही जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने टीम इंडिया अंतिम सामन्यात मैदानात उतरणार आहे.

भारताचा संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, वैभव सूर्यवंशी, विप्रज निगम.

श्रीलंकेचा संघ: एशेन बंडारा, लसिथ क्रूसपुल, सिनेथ जयवर्धने, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), नुवानिडू फर्नांडो, सहान अराचिगे (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो, विजयकांथ व्यासकांथ, नुवान तुषारा, थारिंडू रत्नायके, वानुजा सहान, सोहन डी लिवेरा, गरुका संकेथ.

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Web Title: India beat sri lanka asian games 2026 cricket semifinal india pakistan final sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • asian games 2026
  • India vs Pakistan
  • India vs Sri Lanka

संबंधित बातम्या

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
1

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई
2

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड
3

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड

Asian Games 2026: कायनान आणि नीरूने नेमबाजीत आशियाई विक्रम मोडून रचला, अजून एका सुवर्णपदकाची भर
4

Asian Games 2026: कायनान आणि नीरूने नेमबाजीत आशियाई विक्रम मोडून रचला, अजून एका सुवर्णपदकाची भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.