Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

IND vs SL 2nd Test Playing 11: भारतीय संघ कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 22, 2026 | 05:19 PM
IND vs SL 2nd Test Playing 11

IND vs SL 2nd Test Playing 11

Follow Us
Follow Us:
  • कुलदीप यादवला मिळणार डच्चू?
  • टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये मोठा बदल?
  • भारताची संभाव्य प्लेइंग ११
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी २३ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाने गॉल कसोटीत दणदणीत विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. हे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे टीम इंडिया श्रीलंकेला व्हाईटवॉश देऊन मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

कुलदीप यादवला मिळणार डच्चू? सारांशला संधी

पहिल्या कसोटीत आपल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीने या दोघांनी टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, गॉल कसोटीत खेळपट्टीकडून चांगली साथ मिळूनही कुलदीप यादवने दोन डावांतील २५ षटकांत केवळ एकच विकेट घेतला. या सामन्यात कुलदीप सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने प्रति षटक चारपेक्षा जास्त धावा दिल्या. त्यामुळए कोलंबो कसोटीत कुलदीप यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. श्रीलंकेच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या जास्त असल्याने, मध्य प्रदेशच्या ऑफ-स्पिनर सारांश जैनला कसोटी पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. कुलदीप शुक्रवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही, त्यामुळे त्याला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळले जाऊ शकते.

फलंदाजी विभागाची बदलाची शक्यता कमी

देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली असून, तो दुसऱ्या कसोटीतही आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. शुभमन गिल चौथ्या, ऋषभ पंत पाचव्या आणि ध्रुव जुरेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. मागील सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने संघात आपले अंतिम ११ खेळाडूंमधील आपले स्थान पक्के केले आहे. यामुळे सरफराज खानला सध्या आपल्या संधीची वाट पाहावी लागेल. दरम्यान, डावाच्या सुरुवातीला यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या उपस्थितीमुळे संघाला मजबूत टॉप ऑर्डर मिळाला आहे.

प्रसिद्ध कृष्णा- मोहम्मद सिराज यांची जागा निश्चित

वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज ही जोडी कायम राहण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीमध्ये या दोघांचीही कामगिरी चांगली होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या सामन्यातही संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाजी विभागात मानव सुथार, रवींद्र जडेजा आणि संभाव्य पदार्पण करणारा सारांश जैन हे श्रीलंकेच्या फलंदाजांसमोर आव्हान उभे करेल.

भारताची संभाव्य प्लेइंग ११:

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (क), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मानव सुथार, सारांश जैन, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.

Mitchell Starc चा भेदक मारा! बांग्लादेशची ‘हवा टाईट’; ६ विकेटसह WTC मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

Web Title: Ind vs sl 2nd test playing 11 kuldeep yadav out saransh jain debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Kuldeep Yadav
  • playing 11
  • Test Series

संबंधित बातम्या

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
1

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.