Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव! दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री

IND vs SL Sri Lanka announced Squad for 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 21, 2026 | 04:38 PM
IND vs SL: मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव! दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर
  • दोन खेळाडूंचे होणार टेस्ट डेब्यू?
  • मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेची तयारी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्याांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २३ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. टीम इंडिया देखील दुसऱ्या कसोटीसाठी कोलंबोमध्ये दाखल झाली आहे. तर, श्रीलंका क्रिकेट (SLC) ने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.श्रीलंकेचा संघ खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त आहे, त्यामुळे सुरुवातीला केवळ एका कसोटीसाठी संघ जाहीर करण्यात आला होता. आता, दुसऱ्या कसोटीसाठीच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहे.

BWF World Championships 2026: त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंदची कमाल; चीनला हरवून १५ वर्षांनंतर महिला दुहेरीत भारताचे पदक

श्रीलंकेने संघात केले मोठे बदल

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन दिवस आधी संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहरे पडलेला दिनेश चांदीमलला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी संघात आलेल्या पसिंदू सुरियाबंदारालाही संघातून वगळण्यात आले आहे. दुसरा सलामीवीर निशान मदुशंकाला संघात स्थान मिळाले नाही, तर गोलंदाजी अष्टपैलू रमेश मेंडिस आणि वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. श्रीलंकेने अष्टपैलू साहन अराचिगे आणि फलंदाज कामिल मिशारा यांचा १४ सदस्यीय संघात समावेश केला आहे. या दोन्ही खेळाडूंनी अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. अंतिम ११ खेळाडूंमध्ये ज्याला संधी मिळेल, तो आपला पहिलाच सामना खेळेल.

अराचिगेची भारत ‘अ’ संघाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी

अराचिगेने अलीकडेच भारत ‘अ’ संघाविरुद्ध श्रीलंका ‘अ’ क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्याने या सामन्यात शानदार फलंदाजी केली होती. अराचिगेने पहिल्या सामन्यात ७२ धावा आणि दुसऱ्या सामन्यात १२७ धावा केल्या होत्या. दोन अनधिकृत सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाज साई सुदर्शननंतर अराचिगे हा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. अराचिगे त्याच्या कसोटी पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

WTC अंतर्गत खेळली जाणार मालिका

पहिल्या सामन्यातील पराभवामुळे आणि खेळाडूंच्या दुखापतीमुळे श्रीलंका संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. संघाने पहिला सामना आधीच गमावला असून, मालिका वाचवण्यासाठी आता दुसरा सामना त्यांना जिंकावा लागेल. ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे कारण ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली जात आहे. या गुणतालिकेत भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंका क्रिकेट संघ: लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पसिंदु सूर्याबंदारा, कामिंदू मेंडिस (उपकर्णधार), धनंजया डी सिल्वा (कर्णधार), साहन अराचिगे, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रत्नायके, लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी.

ENG vs PAK: राव कसला हा खेळ! चक्क बॉलच फोडला; जोश टंग अन् रॉबिन्सनने कसा केला पाकिस्तानचा गेम ओव्हर…

Web Title: Ind vs sl 2nd test sri lanka announced squad include arachchige mishara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Sri Lanka cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

याला म्हणतात दरारा! Sri Lanka विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी Team India चे कोलंबोत ‘ग्रँड वेलकम’
1

याला म्हणतात दरारा! Sri Lanka विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी Team India चे कोलंबोत ‘ग्रँड वेलकम’

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित
2

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?
3

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
4

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.