फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध श्रीलंका : T२० महिला विश्वचषक २०२४ दिवसेंदिवस सुरु आहे, यामध्ये अनेक मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत. विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाचा पहिला न्यूझीलंड विरुद्ध पार पडला. यामध्ये भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडने ५८ धावांनी पराभव केला आहे. त्यानंतर भारताच्या महिला संघाने त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध झाला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे आता या विजयासह भारतीय संघाचे उपांत्य फेरीमध्ये जाण्याची मार्ग मोकळा होत आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे. भारतीय संघाचे पुढील सर्व सामने महत्वाचे आहेत.
भारतीय संघाने पहिला सामना गमावल्यामुळे संघासाठी सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहेत. टीम इंडिया हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी करत आहे. भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध आहे, या स्पर्धेमध्ये श्रीलंकेच्या संघाचे आतापर्यत २ सामने झाले हे दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये शेवटची लढत आशिया कपमध्ये फायनलच्या सामन्यात झाली होती. यामध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यामध्ये बदला घेण्याची संधी आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणार भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. महिला T२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारद्वारे केले जाईल.