फोटो सौजन्य - X (Proteas Men)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचा पहिला डाव आता संपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत 8 विकेट्स गमावून 297 धावा केल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करम याने कमालीची खेळी दाखवली त्याने संघासाठी अर्धशतक झळकावले.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, एडन मार्करम याने 81 चेंडूंमध्ये 82 धावा केल्या यामध्ये त्यांनी नऊ चौकार मारले. तर रॉयल रिकल्टन आणखी एकदा स्वस्तात बाद झाला त्याने 43 चेंडूमध्ये 33 धावा केल्या आणि यामध्ये त्याने चौकार मारले. मॅथ्यू ब्रीट्झके याने संघासाठी अर्धशतक झळकावले त्याने 56 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. या त्याने एक षटकार आणि सात चौकार मारले. ट्रिस्टन स्टॅब्स हा शून्यावर बाद झाला.
तर दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा आणि t20 मालिकेचा स्टार फलंदाज देव्हार्ड ब्रेव्हिस आज फेल ठरला. ब्रेव्हिसने आज दोन चेंडूंमध्ये सहा धावा केल्या यामध्ये त्याने एक षटकार मारला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा याने या सामन्यातही चांगले कामगिरी केली. त्याने संघासाठी 74 चेंडूंमध्ये 65 धावा केला यामध्ये त्यांनी पाच चौकार मारले.