IND vs SL: शुभमन गिलचा अप्रतिम झेल (फोटो सौजन्य - X.com)
भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ४६२ धावा करत पहिला डाव संपवला आणि त्यानंतर श्रीलंकेच्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये सिराजने भारताला चांगला ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि पहिली विकेट घेतली. त्यानंतर आठव्या ओव्हरमध्ये मानव सुथारने दुसरी विकेट घेत पुन्हा श्रीलंकेच्या टीमला दणका दिला. तर गिलने जबरदस्त कॅच घेत आपले मनसुबे व्यक्त केले. श्रीलंकेच्या संघाला आजच्या दिवसात माघारी धाडण्याचा नक्कीच टीम इंडियाचा प्रयत्न असणार आणि हा सामना खिशाला घालण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम सज्ज झाली आहे.
IND vs SL: पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने घेतली पहिली विकेट, 27 धावांवर 2 आऊट स्थिती
Shubman Gill The Fielder Never Disappoints 🔥🔥 what a fire catch 🔥🔥🤌🤌#shubmangill#indvssl pic.twitter.com/8WrM8vlXi8 — Shubman Gill Parody (@Shubmanforever) August 17, 2026
खरं तर, भारताच्या ४६२ धावांच्या पहिल्या डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. यजमानांनी अवघ्या ५३ धावांत तीन गडी गमावले. कुलदीप यादव १७ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि कामिंदू मेंडिसने त्याचा पहिलाच चेंडू पायांनी हवेत शॉर्ट कव्हरच्या दिशेने ढकलला. तिथे तैनात असलेल्या गिलने हवेतच चेंडू पाहिला आणि डावीकडे झेप घेऊन पूर्ण ताकदीने एका हाताने झेल घेतला. मेंडिसने १४ धावा केल्या.
२५ चेंडूंत १४ धावा करून बाद झालेला कामिंदू मेंडिस भारतासाठी किती धोकादायक ठरू शकला असता, हे आता गुपित राहिलेले नाही. त्याच्या बाद होण्याने श्रीलंकेला ५९ धावांवर चौथा धक्का बसला. या पराभवातून श्रीलंका पूर्णपणे सावरली नव्हती, तोच १० षटकांच्या आत कर्णधार धनंजय डी सिल्वादेखील बाद झाला. ४१ चेंडूंत २१ धावा करणारा डी सिल्वा जडेजाचा पहिला बळी ठरला आणि श्रीलंकेचा निम्मा संघ ९० धावांत बाद झाला. सध्या श्रीलंकेची स्थिती नक्कीच चांगली नाही. दरम्यान भारतीय गोलंदाज सर्व टीम पूर्णपणे कशी लवकरात लवकर बाद होईल याचाच प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
IND vs SL: Live Updates तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 462 धावांवर संपला, श्रीलंकेसमोर आव्हान