सिराज आणि मानव सुथारने घेतल्या विकेट्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
IND vs SL: गॉल कसोटीच्या पहिल्याच षटकात भारतीय संघाला यश मिळाले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विकेट घेतली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय डाव ४६२ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर श्रीलंकेची सलामीची जोडी, निशान फर्नांडो आणि लाहिरू उदारा, फलंदाजीसाठी मैदानात उतरली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर सिराजने भारतासाठी विकेट घेतली. भारतासाठी ही नक्कीच दिलासादायक सुरूवात आहे. पहिल्या कसोटीत भारताने चांगला खेळ केला असून आता सर्व गोलंदाजांच्या खेळीवर अवलंबून आहे. तर मानव सुथारनेदेखील त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आहे. दिनेश चंडीमलला आऊट करत भारताने चांगलीच पकड मिळवली आहे.
मोहम्मद सिराजने निशान फर्नांडोला बाद केले. सिराजने टाकलेला चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर वळत होता. फर्नांडोने तो फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची बाहेरील कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलच्या हातात गेला. निशान फर्नांडो आपले खातेही उघडू शकला नाही आणि श्रीलंकेला शून्य धावांवर पहिला धक्का बसला.
IND vs SL: Live Updates तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 462 धावांवर संपला, श्रीलंकेसमोर आव्हान
श्रीलंकेचा सलामीवीर निशान फर्नांडो उत्कृष्ट फॉर्मात आहे. त्याने सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या डावात धावबाद होण्यापूर्वी त्याने ६५ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि एका षटकारासह ६६ धावा केल्या. दुसऱ्या डावात ७३ चेंडूंमध्ये ६३ धावा करून तो दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. मात्र सिराजने त्याची विकेट काढत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
मानव सुथारने भारताला दुसरे यश मिळवून दिले. कर्णधार शुभमन गिलने आठव्या षटकात या फिरकी गोलंदाजाला गोलंदाजीसाठी आणले. सुथारने आपल्या पहिल्याच चेंडूवर दिनेश चंडीमलला बाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेर असलेला तो चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. आठव्या षटकात श्रीलंकेची धावसंख्या ३१ धावांवर दोन गडी बाद अशी होती.
भारताचा पहिला डाव ४६२ धावांवर रोखला गेला
श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात भारताचा डाव ४६२ धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाची शेवटची विकेट प्रसिद्ध कृष्णाच्या रूपाने पडली, त्याने केवळ २ धावा केल्या आणि कुलदीप यादव १३ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान पहिल्या डावात देवदत्त पडिक्कलने टीम इंडियासाठी १६२ धावा करत दमदार खेळी केली. केएल राहुलने ८२ धावा आणि ध्रुव जुरेलने ५१ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक चार बळी घेतले.