Buldhana Diwali Vehicle Sales
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत दुचाकी खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली. एकूण नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये ९७० दुचाकी, १८० चारचाकी आणि इतर प्रकारच्या ९४ वाहनांचा समावेश आहे.
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी आधीच नोंदणी केली होती. त्यामुळे बुलढाणा, खामगाव, शेगाव आणि मलकापूरसह जिल्हातील प्रमुख शहरांमधील बाहन विक्री केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली. मध्यमवर्गीय कुटुंबांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिले, तर अनेकांनी चारचाकीचे स्वप्न पूर्ण केले.
यंदा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही वाहन खरेदीचा उत्साह कायम राहिला. वाहन कंपन्यांकडून देण्यात आलेल्या आकर्षक सवलती आणि सुलभ कर्ज योजनांमुळे ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन मिळाले. परिणामी, अवध्या दहा दिवसांत वाहन बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली.
बुलढाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पवन नव्हाई म्हणाले की, वाहन नोंदणीमुळे परिवहन विभागाला चांगला महसूल मिळाला, ऑनलाइन प्रणालीमुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली असून नागरिकांना वैळेत कागदपत्रे मिळत आहे.
दुचाकी ९७०
चारचाकी ९४
एकूण १.२४४
Ans: १ ते १० नोव्हेंबर या दहा दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात एकूण १ हजार २४४ नवीन वाहनांची नोंदणी झाली.
Ans: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीतून जिल्ह्यात ३ कोटी ८३ लाख ७६ हजार ४९७ रुपयांची उलाढाल झाली.
Ans: दिवाळीत दुचाकी वाहनांना सर्वाधिक पसंती मिळाली असून दहा दिवसांत ९७० दुचाकींची नोंदणी झाली.






