जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आयोजित केलेला शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला होता. पण त्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला. या प्रकारानंतर खासदार संजय राऊत यांनी संजय जाधव यांच्यावर हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले की, ठाकरेंशी गद्दारी केली, हीच त्यांची मोठी चूक आहे. त्यांच्याकडून जरांगे पाटील यांनी काय अपेक्षा करावी? जरांगे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. ते पुन्हा संसदेत जाणार नाहीत, याची काळजी शिवसैनिक घेतील. मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असतानाच संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलावून मेळावा घेतला. हा मेळावा रद्द करावा अशी जरांगे पाटील यांची भूमिका होती. पण त्यानंतरही जाधव यांनी तोमेळावा घेतला. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जरांगे पाटील यांची भूमिका होती. त्यांची तळमळ, तडफड मी पाहिली. कारण संजय (बंडू) जाधव यांना निवडून आणण्यााठी जरांगे पोटील यांनी खूप मोठी मदत केली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी जाधव यांच्याकडे मेळावा रद्द करण्याची भूमिका घेतली असावी. तो मेळावा जाधव यांनी रद्द करायला हवा होता, अशी टिकाही जरांगे पाटील यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री आरक्षणाच्या विषयावर कुंपणावर बसून आहेत. त्यांनी कधीही या प्रश्नावर मार्ग काढलेला नाही. ज्युनियर मंत्री आणि मुंबईतील आमदारांना चर्चेसाठी पाठवले जाते; मात्र प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ काढावाच लागेल. एकाही समाजाला न्याय देण्यात ते यशस्वी झालेले नाहीत. फक्त समाजात वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे.”
Rahul Gandhi FIR Haldwani: राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्या
“भाजपने जातीय राजकारण करणे बंद केले पाहिजे. आगी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यांना फक्त श्रेय घ्यायचे आहे. विविध पक्षांतील प्रमुख पाच जाणत्या नेत्यांशी ते चर्चा करत नाहीत. जोपर्यंत त्यांना ही सुबुद्धी येत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना नेता मानायला तयार नाही. अशी टिकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
मराठा समाजाच्या मागील मुंबईतील आंदोलनावेळी त्यांची फसवणूक झाली. सरकारने चर्चेची तयारी ठेवली पाहिजे. पण जरांगे पाटील यांना कसे गुंडाळता येईल, यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. कालची चीड ही फसवणुकीतून निर्माण झाली आहे.” असंही संजय राऊत यांनी यावेळी नमुद केलं.
मुंबई बँक निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात फोडाफोडीशिवाय दुसरे काही स्थान नाही. त्यांच्या डोक्याचा साचा शोधायचा आहे. फोडा, झोडा आणि विकत घ्या, याशिवाय त्यांना काही सुचत नाही. शेणातील किड्यांना भाजपने मोठे केले आहे, तर ते किडे भाजपलाच चावणार. मुंबई बँकेच्या निवडणुकीत आमचेही पॅनेल असेल.” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.






