
ind vs wi t 20
IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
वेस्ट इंडिजची फलंदाजी
ज्वेल अँड्र्यू आणि कर्णधार शाई होपने वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. मात्र ज्वेल अँड्र्यू हा केवळ 21 रन्सची खेळी करून आउट झाला. त्यानंतर शिमरन हेटमायर आणि शाई होपने वेस्ट इंडिजची बाजू सांभाळून धरली . पॉवर प्लेमध्ये अधिक विकेट न गमावता धावसंख्या वाढवण्यावर त्यांनी भर दिलचे दिसून आले. शिमरन हेटमायर 33 रन्स करून आउट झाला. तर रोमवेन पॉवेल देखील 24 रन्स करून आउट झाला. शेरफेन रदरफोर्ड आणि कर्णधार शाई होपने वेस्ट इंडिजला 200 च्या पार नेऊन ठेवले. दोघांनी अत्यंत आक्रमक खेळी केली. शाई होपने शानदार शतक ठोकले.
Loving life in India is the skipper! 💥🏏 #INDvWI | #MenInMaroon https://t.co/PjqSMeeFQH — Windies Cricket (@windiescricket) October 14, 2026
भारताची गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांना पॉवर प्ले मध्ये वेस्ट इंडिजच्या एकाच फलंदाजाला आउट करता आले. भारताच्या फिरकीपटू असलेल्या अक्षर पटेलने ज्वेल अँड्र्यूला आउट करून भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रिन्स यादवने हेटमायरला तर अर्शदीप सिंगने पोवेलला आउट केले.
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स डी यादव, मयंक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिज: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, अमीर जांगू, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.