
Renuka Singh Ruled Out from ODI series
बीसीसीआयने रेणुका सिंग ठाकूरबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. बीसीसीआयने म्हटले की, ‘रेणुका सिंग ठाकूर सध्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पन्नास षटकांच्या सामन्यांसाठी आवश्यक गोलंदाजीचा सराव करत आहेत. यामुळे तिला एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे.’ रेणुकाच्या जागी संघात २२ वर्षीय आसामी वेगवान गोलंदाज जिंतिमानी कलिताला स्थान देण्यात आले आहे. कलिता पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभागी होणार आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी वडोदरा येथे खेळला जाईल. स्मृती मंधाना पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली आणि टी-२० मालिकेत झिम्बाब्वेला ३-० ने पराभूत केले. एकदिवसीय सामन्यांमधील झिम्बाब्वे संघाविरुद्ध पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका स्मृती मंधानासाठी खास असणार आहे. पूर्णवेळ एकदिवसीय कर्णधार म्हणून ही तिची पहिलीच मालिका असेल. तिने हरमनप्रीत कौरची जागा घेतली आहे. कौरचा फॉर्म काही काळापासून चर्चेत होता आणि ती संघर्ष करत होती. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात तिने शानदार पुनरागमन केले. तिने तिने १० चौकार आणि पाच षटकारांसह ४१ चेंडूंमध्ये नाबाद ९१ धावा केल्या.
भारतीय संघ
प्रतिका रावल, स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), सायली सातघरे, क्रांती गौड, श्री चरणी, यास्तिका भाटिया, वैष्णवी शर्मा, नंदिनी शर्मा, तेजल हसबनीस, जिंतिमणि कलिता.
झिम्बाब्वे संघ
जोसेफिन नकोमो (कर्णधार), चिएड्झा धुरुरू (यष्टीरक्षक), शार्न मेयर्स, मॉडेस्टर मुपाचिकवा (विकेटकीपर) न्याशा ग्वांझुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलीस नधलोवु, ओलिंदर चारे, कुदझई चिगोरा, फ्रांसिस्का चिपारे, तेंडाई मकुशा, लोरिन फिरी, नोमवेलो सिबांडा.