Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका

IND W vs ZIM W India Beat Zimbabwe in 1st ODI: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी खेळला गेला. भारताने या सामन्यात शानदार कामगिरी करत एकतर्फी विजय मिळवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 23, 2026 | 08:40 PM
India W Beat Zimbabwe W

India W Beat Zimbabwe W

Follow Us
Follow Us:
  • प्रतीका रावलचे झंझावाती शतक
  • श्री चरणीची चार विकेट्सची कमाल
  • भारताची झिम्बाब्वेवर एकतर्फी मात
IND W vs ZIM W: भारत महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळला गेला. हा सामना कोटांबी येथील वडोदरा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात झिम्बाब्वेची कर्णधार नोमवेलो सिबांडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या संपूर्ण संघ ५० षटकांमध्ये फक्त १९७ धावाच करु शकला. प्रत्युत्तरात भारताने २७.१ षटकांध्ये लक्ष्य गाठले. प्रतिका रावलच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला ९ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

72 वर्षांचा दुष्काळ संपवला! आशियाई टेबल टेनिसमध्ये भारताचा डंका; Harmeet Desai-Yashaswini Ghorpade च्या जोडीने जिंकले कांस्यपदक

झिम्बाबेचा संपूर्ण संघ १९७ धावांवर गारद

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या झिम्बाब्वेचा संघ ४९.५ षटकांत १९७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. बिलव्हेड बिझाने शानदार फलंदाजी करत ९२ चेंडूंमध्ये ६२ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. मॉडेस्टर मुपाचिकवाने २५, तर मिचेल मावुंगाने २९ धावा केल्या.

श्री चरणीने दोघांनाही पव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताकडून डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणीने २३ धावा देऊन ४ विकेट घेत शानदार गोलंदाजी केली. ही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी होती. वेगवान गोलंदाज क्रांती गौडने ३ विकेट् घेतले, तर दीप्ती शर्माने फिरकीच्या जाळ्यात दोन खेळाडूंना अडकवले. याशिवा, शफाली वर्मानेही एक विकेट घेतला. भारताने झिम्बाब्वेला १९७ धावांवर गुंडाळले.

प्रतिका रावलने शतक झळकावून भारताला मिळवून दिला विजय

१९८ धावांचे लक्ष्य गाठताना, भारतीय महिला संघाने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. सलामीवीर प्रतीका रावलने शानदार शतक झळकावून संघाची सूत्रे हाती घेतली आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिली. तिच्या खेळीमुळे संघाचा विजय निश्चित झाला. प्रतीकाने कर्णधार स्मृती मंधानासोबत पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. मंधाना बाद होण्यापूर्वी ३२ धावा करून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली.

मंधाना बाद झाल्यानंतर शफाली वर्मा प्रतीकासोबत फलंदाजीला आली. दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा केल्या. आक्रमक फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजीवर दबाव कायम ठेवला. शफाली ६४ धावांवर नाबाद राहिली, तर प्रतीकाने आपले शतक पूर्ण करून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय महिला संघाने २७.१ षटकांत एक विकेट गमावून २०० धावा पूर्ण केल्या आणि हा सामना ९ विकेट्सने जिंकला.

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय

Web Title: Ind w vs zim w pratika rawal century shri charani 4 wickets pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Indian Women Cricket Team
  • Pratika Rawal
  • Shree Charani
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर
1

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral
2

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत
3

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट
4

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.