IND Vs ZIM : नाद करायचा नाय! झिम्बाब्वेला लोळवत भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी, सौजन्य : एक्स
IND Vs ZIM : वडोदराच्या बीसीए स्टेडियममध्ये पार पडलेल्या ODI मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने झिम्बॉब्वेचा 121 धावांनी पराभव करत सामन्यासह मालिकाही आपल्या खिशात घातली. हरमनप्रीत कौर व दीप्ति शर्माच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना भारताने झिम्बॉब्वेसमोर 6 बाद 329 धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या डावात वैष्णवी शर्माने 4 विकेट घेत झिम्बॉब्वेची मधली फळी उद्धवस्त केली. अशाप्रकारे झिम्बॉब्वेला सर्वबाद 207 धावांचा पल्ला गाठता आला.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मंधाना आणि प्रतिका रावलने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला. संघाची धावसंख्या 1 असताना स्मृती शून्यावर बाद झाली. 19 धावांवर भारताने दुसरी विकेट गमावली. शफाली वर्मा 8 चेंडूंत 8 धावा करून बाद झाली. हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांनी आपली भागीदारी कायम ठेवत भारताला 100 धावांच्या पुढे नेले.
प्रतिकाच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. प्रतिका 67 चेंडूवर 61 धावा करुन तंबूत परतली. न्याशा ग्वांनजुराने तिला बाद केले. त्यानंतर, तेजल हसनबीस ओएलिंडर चारेच्या चेंडूवर 3 धावा करुन स्वस्तात बाद झाली. यानंतर, हरमनप्रीत आणि दीप्ती शर्माने भारताचा डाव पुढे नेला. हरमनप्रीतने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले. तिने 121 चेंडूमध्ये 126 धावा केल्या. कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीत कौरने आपले पहिले शतक झळकावले आहे. हरमनप्रीतच्या विकेटनंतर, दिप्तीने आक्रम खेळी सुरुच ठेवली. दिप्तीने देखील 86 चेंडूमध्ये झंझावाती शतक ठोकले. 86 चेंडूमध्ये 106 धावा करत ती नाबाद राहिली. हरमनप्रीत आणि दिप्तीच्या उत्कृष्ट खेळीने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताने 50 षटकांत ६ विकेट्स गमावून 328 धावांचा डोंगर उभा केला. झिम्बाब्वेकडून सिबांडाने 2 विकेट्स घेतले. तर, माकुशा, माउंगा, ग्वांनुजुरा आणि चारे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Deepti Sharma goes back-2️⃣-back 👊 Updates ▶️ https://t.co/ECnfLgdfi7 #TeamIndia | #INDvZIM | @mflone_ | @Deepti_Sharma06 https://t.co/Hk9n8Upr7W — BCCI Women (@BCCIWomen) October 25, 2026
फलंदाजीनंतर आता गोलंदाजांवर झिम्बॉव्बेला रोखण्याची जबाबदारी होती. 9 व्या षटकात 38 धावांवर झिम्बॉब्वेचा लॉरेन फिरीकरवी पहिला विकेट पडला. झिम्बॉब्वेच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी चिकट खेळीचा नजराणा दाखवला. कारण त्यांचा दुसरा विकेट 23 व्या षटकात 107 धावांवर पडला. चिपो ट्रिपानो (46) आणि मॉडस्टर मुपाचिक्वा (49) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. या दोघी वैष्णवी शर्माच्या शिकार ठरल्या. तसेच त्यांच्यानंतर मधल्या फळीत बिल्वड बिझा (34) वगळता कोणीच मोठी खेळी करू शकलं नाही.
वैष्णवीने 39 धावा देत 4, तर अष्टपैलू दीप्तिने 32 धावांवर 3 गडी बाद केले. तसेच श्री चरणी, सायली सातघरे व जिंतामणी कलिता यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला. अशाप्रकारे भारताने विजयासह मालिकाही आपल्या नावे केली.
Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला
Ans: भारताने 50 षटकांत 6 विकेट्स गमावून 328 धावा केल्या. त्यामुळे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 329 धावांचे लक्ष्य होते.
Ans: दीप्ती शर्माने 86 चेंडूंत नाबाद 106 धावा केल्या. गोलंदाजीतही तिने 3 विकेट्स घेतल्या.
Ans: हरमनप्रीत कौरने 121 चेंडूंत 126 धावांची शानदार खेळी केली.






