IND W vs ZIM W 2nd ODI Live
IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक ज प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मृती मंधानाने सांगितले की, या सामन्यात क्रांती गौडला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या जागी वैष्णवी शर्माला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. ती मंधाना आणि प्रतिका रावलने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला. संघाची धावसंख्या १ असताना स्मृती शून्यावर बाद झाली. १९ धावांवर भारताने दुसरी विकेट गमावली. शफाली वर्मा ८ चेंडूंत ८ धावा करून बाद झाली. हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांनी आपली भागीदारी कायम ठेवत भारताला १०० धावांच्या पुढे नेले.
प्रतिकाच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. प्रतिका ६७ चेंडूवर ६१ धावा करुन तंबूत परतली. न्याशा ग्वांनजुराने तिला बाद केले. त्यानंतर, तेजल हसनबीस ओएलिंडर चारेच्या चेंडूवर ३ धावा करुन स्वस्तात बाद झाली. यानंतर, हरमनप्रीत आणि दीप्ती शर्माने भारताचा डाव पुढे नेला. हरमनप्रीतने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले. तिने १२१ चेंडूमध्ये १२६ धावा केल्या. कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीत कौरने आपले पहिले शतक झळकावले आहे. हरमनप्रीतच्या विकेटनंतर, दिप्तीने आक्रम खेळी सुरुच ठेवली. दिप्तीने देखील ८६ चेंडूमध्ये झंझावाती शतक ठोकले. ८६ चेंडूमध्ये १०६ धावा करत ती नाबाद राहिली. हरमनप्रीत आणि दिप्तीच्या उत्कृष्ट खेळीने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताने ५० षटकांत ६ विकेट्स गमावून ३२८ धावांचा डोंगर उभा केला. झिम्बाब्वेकडून सिबांडाने २ विकेट्स घेतले. तर, माकुशा, माउंगा, ग्वांनुजुरा आणि चारे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारताची पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर स्मृती मंधानाची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे. याआधी, टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने जिंकली. भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्बे ९ विकेट्सने धुव्वा उडवला होता. या विजयासह भारतीय संघतीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता संघाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.
भारत: प्रतिका रावल, स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, तेजल हसबनीस, दिप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), वैष्णवी शर्मा, सायली सातघरे, श्री चरणी, जिंतामणी कलिता.
झिम्बाब्वे: मॉडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), लॉर्न फिरी, चिपो मुगेरी तिरिपानो, बिलव्ड बिजा, जोसफिन नकोमो (कर्णधार), न्याशा ग्वांनजुरा, चिएड्झा धुरुरु, मिचेल मावुंगा, नोमवेला सिबांडा, तेंडाई माकुशा, ओलिएंडर चारे.
थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत






