Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs AFG A: 2 कॅच सुटले, अंपायरकडून मिळाले जीवनदान तरीही 28 बॉल्समध्येच Vaibhav Sooryavanshi चा खेळ आटोपला

वैभव सूर्यवंशीची बॅट पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि दोन झेल सोडूनही तो अफगाणिस्तानविरुद्ध केवळ २८ चेंडू खेळू शकला. यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूने केलेले सेलिब्रेशन व्हायरल झाले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 17, 2026 | 12:30 PM
वैभव सूर्यवंशी झेलबाद झाल्यावर अफगाणिस्तानच्या बॉलरचे सेलिब्रेशन व्हायरल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/X.com)

वैभव सूर्यवंशी झेलबाद झाल्यावर अफगाणिस्तानच्या बॉलरचे सेलिब्रेशन व्हायरल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/X.com)

Follow Us
Follow Us:
  • केवळ ३८ धावांमध्ये वैभव सूर्यवंशी बाद
  • पुन्हा एकदा वैभव अपयशी 
  • अफगाणिस्तानच्या खेळाडूचे वेगळेच सेलिब्रेशन, झाले व्हायरल 
भारत ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ यांच्यातील त्रिकोणीय मालिकेच्या पाचव्या सामन्यात भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीला नशिबाची साथ मिळाली, पण तो या सुवर्णसंधीचा फायदा उठवू शकला नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच पंचांच्या एका निर्णयामुळे जीवनदान मिळालेल्या वैभवला त्यानंतर अफगाण क्षेत्ररक्षकांनी आणखी दोन महत्त्वाच्या संधी दिल्या. सामन्यात तीन वेळा जीवदान मिळूनही, वैभव सूर्यवंशीला आपल्या खेळीत प्रगती करता आली नाही आणि अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच तो बाद झाला. केवळ ३८ धावा करून वैभव तंबूत परतला. 

IPL मध्ये कमालीची कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी कोणत्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याने एकाही सामन्यात अर्धशतकही केलेले नाही. हे त्याच्यासाठी नक्कीच चांगले नाही. सध्या वैभव हाच एकमेव चर्चेचा विषय झाला आहे. याशिवाय चुकीच्या गोष्टींसाठीही सध्या वैभवची चर्चा होत आहे. श्रीलंकेविरुद्ध बाचाबाची झालेला व्हिडिओही आता व्हायरल होत आहे. 

IND A vs SL A Controversy: वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला! श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड, डिकवेलाही अडचणीत

तिसऱ्या पंचांकडून वैभवला जीवनदान मिळाले

सामन्याच्या दुसऱ्या षटकात, जेव्हा पंचांनी अफगाण गोलंदाजाचा नाबाद झेल क्लीन असल्याचे घोषित केले, तेव्हा मैदानावर बरीच खळबळ उडाली. यानंतरही, अफगाण क्षेत्ररक्षकांनी अत्यंत खराब क्षेत्ररक्षण करत आणखी दोन झेल सोडले. एकंदरीत, वैभवला त्याच्या संपूर्ण खेळीत अनेकदा जीवदान मिळाले. मात्र, त्याचे नशीब चांगले असूनही, तो अफगाण गोलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयशी ठरला आणि अखेरीस डावाच्या आठव्या षटकात त्याचे नशीब संपले.

वैभवने विकेट गमावली

Vaibhav Sooryavanshi getting out in the same way – Short ball outside the off stump – Missed IPL centuries twice on the same ball
– Got out in the same way in all four games in this tour
Vaibhav got exposed technically so early that even domestic players of Srilanka and… https://t.co/q8EIqIdUCL — Raja (@_raja_kumar) June 17, 2026

भारतीय डावाच्या ७.६ व्या षटकात, अफगाणिस्तानचा गोलंदाज फरिदून दाउदझाईने अखेरीस वैभववर आपला बदला घेतला. फरिदूनच्या एका आखूड चेंडूवर वैभवने लेग साईडच्या दिशेने एक मोठा पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या खालच्या भागाला लागून हवेत उडाला. कव्हर-पॉइंटला उभ्या असलेल्या खालिद तनीवालने सहज झेल घेतला आणि वैभवचा डाव संपवला. बाद झाल्यानंतर, वैभवला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि निराश होऊन तो आपल्या बॅटच्या खालच्या भागाकडे पाहत क्रीझच्या बाहेर निघून गेला.

वैभव सूर्यवंशी बाद होण्यापूर्वी २८ चेंडू खेळला, त्याने ४ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. वैभवला बाद केल्यानंतर गोलंदाज फरिदून दाउदझाईचा राग आणि जल्लोष स्पष्टपणे दिसत होता. तो मोठ्याने ओरडला आणि बोटाने शांत राहण्याचा इशारा केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसून येत आहे. दरम्यान वैभवची बॅट कधी तळपणार याच प्रतिक्षेत त्याचे चाहते आहेत. 

नशीब असावे तर असे! Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार? BCCI ने दिले ‘हे’ संकेत

Web Title: India a vs afghanistan a vaibhav sooryavanshi got out on 38 runs after 2 catch drops celebration went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • cricket news
  • India vs Afghanistan
  • Sports News

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
2

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
3

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.