Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार

india A squad Announced for Aus A series: भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 09, 2026 | 05:35 PM
india A squad Announced

india A squad Announced

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलिया अ मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
  • देवदत्त पडिक्कल- ऋतुराज गायकवाड कर्णधार
  • हार्दिक पांड्याचाही कमबॅक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या दोन चार दिवसीय आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी वेगवेगळ्या खेळाडूंना नियुक्त करण्यात आले आहे. देवदत्त पडिक्कल दोन चार दिवसीय सामन्यांचे, तर ऋतुराज गायकवाड एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. हार्दिक पांड्याचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु त्याचा सहभाग फिटनेस चाचण्यांवर अवलंबून असेल.

US Open 2026: मोठा उलटफेर! क्वार्टर फायनलमध्ये Carlos Alcaraz चा धक्कादायक पराभव; Ben Shelton ने दाखवला घरचा रस्ता

पडिक्कल मल्टी-डे संघाची कमान सांभाळणार

देवदत्त पडिक्कलला चार दिवसीय सामन्यांसाठी कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. साई सुदर्शनचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नव्हता. आता तो ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध टीम इंडियात परतणार आहे. अमन मोखाडे आणि आयुष पांडे यांनाही संघात स्थान मिळाले आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुमार कुशाग्रचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यश राठोडसोबत शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांचाही चार दिवसीय संघात समावेश आहे. एन. जगदीसन विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहे.

चार दिवसीय संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागात तुषार देशपांडे, अंशुल कंबोज आणि प्रफुल्ल हिंगे यांचा समावेश आहे. प्रफुल्लने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले होते. आता त्याला इंडिया ‘अ’ संघात स्थान मिळाले आहे. या संघात युवा खेळाडूंसोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने प्रभावित केलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे.

गायकवाडकडे कर्णधारपदाची धुरा, हार्दिकचाही संघात समावेश

ऋतुराज गायकवाडला एकदिवसीय कर्णधार, तर देवदत्त पडिक्कलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, हार्दिक फिटनेस चाचणी यशस्वीपणे पार पाडल्यासच या मालिकेत सहभागी होऊ शकेल. साई सुदर्शन आणि प्रियांश आर्य यांचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. रजत पाटीदार, कुमार कुशाग्र आणि नमन धीर मधल्या फळीची धुरा सांभाळतील. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या प्रभसिमरन सिंगकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

🚨 News 🚨 India A squad announced for home series against Australia A, comprising two multi-day matches and three one-day games in Puducherry. Details 🔽https://t.co/qv3pB2OLhj pic.twitter.com/svfhQbnEoV — BCCI (@BCCI) September 9, 2026

कधी सुरु होणार मालिका?

भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील मालिका २२ सप्टेंबर रोजी सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये दोन मल्टी-डे सामने खेळले जातील. दुसरा बहुदिवसीय सामना २९ सप्टेंबर रोजी सुरू होईल. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला, दुसरा सामना ९ ऑक्टोबरला आणि मालिकेचा अंतिम सामना ११ ऑक्टोबरला खेळला जाईल.

मल्टी-डे सामन्यांसाठी भारत अ संघ: अमन मोखाडे, आयुष पांडे, देवदत्त पडिक्कल (कर्णधार), साई सुदर्शन (उपकर्णधार), यश राठोड, शेख रशीद, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे,अंशुल कंबोज, प्रफुल्ल हिंगे एन. एन जगदीशन (विकेटकीपर), नचिकेत भुटे, व्ही वैश्य

वनडे सामन्यांसाठी भारत अ संघ: प्रियांश आर्य, साई सुदर्शन, देवदत्त पडिककल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), निशांत सिंधू, विपराज निगम, अर्शिन कुलकर्णी, अरशद खान, नमन धीर, हार्दिक पांड्या, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), गुरजापनीत सिंग, यश ठाकूर.

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…

Web Title: India a vs australia a squad 2026 padikkal gaikwad hardik pandya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • Hardik Pandya
  • IND VS AUS
  • Ruturaj Gaikwad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.