एडिलेड : टी-२० वर्ल्डकपमधील (T-20 world cup) आज भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सामना पार पडला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ५ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील आजचा चौथा सामना होता. मागील दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पाच विकेटसनी पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ५ धावांनी रोमहर्षक विजय मिळवल्याने भारत आता गुप्र एमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमवत १८४ धावा केल्या.
[read_also content=”अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा 10 लाखावरुन 15 लाख https://www.navarashtra.com/maharashtra/annasaheb-patil-corporation-scheme-loan-limit-from-ten-to-fifteen-lakhs-341235.html”]
पाऊस…आणि भारताला पराभवाची भीती
मैदानात उतरलेला बांग्लादेश संघाने आक्रमक सुरुवात केली. सहा षटकात 60 धावा केल्या. मध्येच पाऊस आल्यानंतर डकवर्थ लुईसनुसार भारत 17 धावांनी मागे होता. त्यामुळं भारताला पराभवाची भीती वाटत होती. अखेर पाऊस थांबला व खेळ पुन्हा सुरु झाला. लॅटीन दासने 60 27 चेंडूत धावांची झुझांर खेळी साकारली. पण ही खेळी विजयापर्यंत पोहचवण्यास अपयशी ठरली. भारताकडून अर्शदीप सिंग व हार्दीक पांड्याने प्रत्येकी दोन विकेटस घेतल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. रोहित शर्मा लवकर माघारी परतला. के एल राहुलने सुरेख अर्धशतकी पार खेळली. यानंतर फलंदाजीस आलेल्या सूर्यकुमारने छोटीशी खेळी करत १६ चेंडूत ३० धावांचे खेळी केली. यात त्याने ४ चौकार मारले. तर हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक व अक्षर पटेल झटपट बाद झाले. अश्विनेने ६ चेंडूत १३ धावा काढत कोहलीला चांगली साथ दिली. भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले आहे. बांग्लादेशकडून हसन मोहम्मद याने तीन विकेट घेतले तर, शाकिब हसन याने दोन विकेट घेतल्या. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर भारताने बांग्लदेशवर पाच धावांनी मात करत गुप्रमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्यामुळं भारताचा सेमिफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
कोहलीचा ‘विराट’ विक्रम…
दरम्यान, भारताची सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. तीन सामन्यात अपयशी ठरलेला के एल राहुलला या सामन्यात फॉर्म गवसला. राहुलने या सामन्यात ३२ चेंडूत २० धावा केल्या. यात त्याने तीन चौकार व चार शानदार षटकार ठोकले. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त दोन धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रंमाकावर आलेल्या विराट कोहलीने विक्रम केला. कोहलीच्या पहिल्या ३ सामन्यांमध्ये एकूण १५६6 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात किंग कोहली (Virat Kohli) धुवांधार अर्थशतकी खेळी खेळली. फक्त ३८ चेंडूत कोहलीने ५० धावा केल्या. तसेच कोहलीच्या आजच्या खेळीच्या जोरावर विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. हा विक्रम किंग कोहलीने मोडला आहे. विराट कोहलीने जयवर्धनेच्या १०१६ धावांचा आकडा पार केला आहे. कोहलीने ४४ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली.