Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SL W : महिला विश्वचषकच्या सलामी सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य! अमनजोत कौर चमकली 

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मधील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २६९ धावा करून श्रीलंकेला २७० धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 30, 2025 | 08:06 PM
IND W vs SL W: India set Sri Lanka a target of 270 runs in the opening match of the Women's World Cup! Amanjot Kaur shines

IND W vs SL W: India set Sri Lanka a target of 270 runs in the opening match of the Women's World Cup! Amanjot Kaur shines

Follow Us
Close
Follow Us:

ICC Women World Cup 2025 : आजपासून (३० सप्टेंबर) आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिलं सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. सामान्याआधी श्रीलंकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीकहा निर्णय घेतला आहे, तर भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४७ ओव्हरचा करण्यात आला आहे. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत पदार्पणवीर अमनजोत कौर आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर ८ विकेट्स गमावून २६९ धावा केल्या आहेत. श्रीलंकाला विजयासाठी २७० धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : IND vs WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका कुठे पहाल? आता सोनीवर नाही तर ‘या’ चॅनेलवर पाहता येणार थरार

गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात श्रीलंकन महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला.  आणि भारत यांच्या प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या सलामी जोडीने डावाची  सुरवात केली.भारताची सुरवात चांगली झाली नाही. भारताची भरवशाची फलंदाज स्मृती मानधना चौथ्या ओव्हरमध्ये १४ धावा करून माघारी परतली. त्यानंतर प्रतिका रावल(३७) आणि हरलीन देओल(४८) यांनी ६७ धावांची भागीदारी केली.  त्यानंतर या दोघी बाद झाल्या आणि भारताच्या डावाला खिंडार पडले. भारतीय संघाच्या विकेट्स पडत राहिल्या.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘मी शब्दांनी नाही, माझ्या बॅटने उत्तर…’, अंतिम सामन्यातील नायक तिलक वर्माकडून पाकिस्तानला शाब्दिक मार

कर्णधार हरमनप्रीत कौर २१ धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज भोपळा न फोडता माघारी गेली. त्यानंतर रिचा घोष २ धावा करून बाद झाली. त्यानंतर मात्र दीप्ती शर्मा आणि पदार्पणवीर अमनजोत कौर यांनी महत्वपूर्ण १०३ धावांची भागीदारी रचत भारताला मजबूत स्थिती आणले. अमनजोत कौरने ५६ चेंडूत ५७ धावा करून बाद झाली. त्यामध्ये तिने ५ चौकार आणि १ षटकार मारला. तर दीप्ती शर्माने ५३ धावा करून ती डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाली. तिने ५३ चेंडूत ५३ धावा केल्या आहेत. त्यात तिने ३ चौकार मारले. तर स्नेह राणा १५ चेंडूत २८ धावा करून नाबाद  राहिली. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर उदेशिका प्रबोधनीने २ विकेट्स घेतल्या. तसेच अचीनी कुलसूरिया आणि चमारी अटापट्टू यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी.

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन : चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, विश्मी गुणरत्ने, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), अचीनी कुलसूरिया, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी, इनोका रणवीरा.

Web Title: India set sri lanka a target of 270 runs in the opening match of the womens world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 07:57 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND vs SL

संबंधित बातम्या

RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी 
1

RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी 

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
2

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.