Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs England 3rd T20I LIVE Score: प्रिन्स यादव-हर्षित राणा जोडीचा धुमाकूळ, भारतासमोर इंग्लंडचे 202 धावांचे आव्हान

मालिकेतील तिसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी२० सामना खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने भारतासाठी धावांचे आव्हान दिले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 07, 2026 | 11:45 PM
हर्षित आणि प्रिन्सने इंग्लंडचे कंबरडे मोडले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हर्षित आणि प्रिन्सने इंग्लंडचे कंबरडे मोडले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि इंग्लंडमध्ये आज तिसरा सामना रंगला 
  • इंग्लंडने पहिले फलंदाजी करताना भारताला   धावांचे आव्हान दिले 
  • भारत आता हरण्याची शृंखला तोडणार की नाही हेच पहावे लागणार आहे 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला जोस बटलरच्या रूपाने पहिला धक्का बसला, तर हॅरी ब्रूक दुसरी विकेट ठरला. या दोन्ही विकेट्स प्रिन्स यादवने घेतल्या आणि भारताला दिलासा दिला. रवी बिश्नोईच्या जागी आज प्रिन्स यादवला संधी देण्यात आली आणि त्याने त्या संधीचे सोनं करत निवड योग्य ठरवली. इंग्लंडने भारताच्या संघाला 202 धावांचे आव्हान दिले आहे. 

IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

इंग्लंडचा खेळ 

इंग्लंडने ४३ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. धोकादायक फलंदाजी करणाऱ्या जोस बटलरची ही विकेट होती आणि प्रिन्स यादवने ही महत्त्वाची विकेट काढत भारताला उत्तम सुरुवात करून दिली. बटलरने या सामन्यात चार चौकार आणि दोन षटकारांसह ३६ धावा केल्या. यानंतर प्रिन्स यादवने इंग्लंडला आणखी एक मोठा धक्का दिला. जोस बटलरला बाद केल्यानंतर, त्याने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकलाही बाद केले. ब्रुक १६ धावांवर बाद झाला. यावेळी इंग्लंडची धावसंख्या ७१ धावांवर २ गडी बाद अशी होती. त्यानंतर बेथलने काही चांगले शॉट्स खेळून खेळामध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ११ व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने आपली जादू दाखवत लागोपाठ दोन बॉलवर बेथल आणि बँटनची पहिल्याच बॉलवर विकेट काढली. 

दुसऱ्या बाजूने फिन सॉल्टने लढा दिला आणि ३६ चेंडूमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण दुसऱ्या बाजूने मात्र इंग्लंडची टीम ढासळली. वरूण चक्रवर्तीला कोणतीही विकेट मिळाली नाही मात्र त्याने ३३ धावा दिल्या. तर अर्शदीपने दुसऱ्या बाजूने चांगली बाजू लाऊन धरली. अक्षर पटेलला मात्र फिन सॉल्टने मैदानावर घाम फोडला असं असूनही अत्यंत महत्त्वाच्या क्षणी अक्षरनेच सॉल्टची विकेट घेत भारताला दिलासा दिला.  इंग्लंडसाठी सर्वाधिक ७० धावा करत तो तंबूत परतला. यानंतर आलेल्या विल जॅक्सने लागोपाठ अक्षरला छक्के मारत आपले मनसुबे दाखवून दिले. मात्र अक्षरने फेकलेल्या बॉलने तो रन आऊट झाला आणि त्याने १४ धावांची भर घातली. याशिवाय सॅम करननेदेखील २४ बॉल्समध्ये ४१ धावा काढल्या. भारताने काही ठिकाणी ढिसाळ क्षेत्ररक्षण केले आणि त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना अधिक धावा करता आल्या. 

वैभव सूर्यवंशीवर सर्वांची नजर 

पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीकडे लागले आहे. त्याने मागील सामन्यात पदार्पण केले आणि १० चेंडूंमध्ये केवळ १४ धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन षटकार मारले. तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभव किती धावा करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शिवाय, आजच्या सामन्यासाठी भारतीय टीम कशी खेळणार हेच पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. 

IND vs ENG: नव्याने सुरूवात! आता इंग्लंडला भिडणार Team India, पूर्ण शेड्युलची लिस्ट

कसे आहेत दोन्ही संघ 

इंग्लंडचा संघ (प्लेइंग इलेव्हन):  फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टोंगे

भारतीय संघः वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा,  इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती

Web Title: India vs england 3rd t20i live score updates first inning score ind vs eng live 202 runs to chase for win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:44 PM

Topics:  

  • cricket news
  • ENG vs IND
  • IND Vs ENG
  • India vs England

संबंधित बातम्या

IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
1

IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’
2

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’

आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग
3

आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! वयाच्या 38 व्या वर्षी ‘या’ वेगवान गोलंदाजाचे दु:खद निधन
4

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! वयाच्या 38 व्या वर्षी ‘या’ वेगवान गोलंदाजाचे दु:खद निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.