Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित

Ireland beat India shreyas iyer leadership unbeaten in 16 consecutive series: टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध मालिकेत २-० ने पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांच्या १६ अपारजित मालिकेचा विजयी रथ थांबला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 02:41 PM
आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित
Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ
  • टीम इंडियाचा विजयी रथ थांबला
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित
भारत आणि आयर्लंड यांच्यात बेलफास्ट येथे दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यात आली. या सामन्यांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. यजमान आयर्लंडने टी-२० मालिकेत भारताचा २- ० ने सूपडा साफ केला. दोन्ही सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवला समोरे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला अवघ्या तीन दिवसांत सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. या दारुण पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपराजित मालिका अखेर संपुष्टात आली आहे. टीम इंडियाचा गेल्या अनेक वर्षांपासून एकही मालिका न हरण्याचा विक्रम अखेर खंडित झाला.

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

१६ मालिकांमध्ये अपराजित

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघासाठी हा पराभव एक मोठा धक्का आहे. रतीय संघाने आपल्या मागील १६ टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जगभरातील संघांवर वर्चस्व गाजवले आहे. या काळात भारताने दोनदा टी२० विश्वचषक आणि एकदा आशिया कप जिंकला. त्यांनी आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकही जिंकले. या आयर्लंड दौऱ्यापूर्वी, भारताने सलग १६ द्विपक्षीय टी-२० मालिकांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम केला होता. भारताचा यापूर्वीचा पाच सामन्यांच्या मालिकेतील पराभव ऑगस्ट २०२३ मध्ये झाला होता, जेव्हा ते वेस्ट इंडिजकडून २-३ ने हरले होते. गेल्या वर्षांत भारतीय संघाने एकूण ७३ टी-२० सामने खेळले, पण कोणताही संघ भारताला मालिकेत पराभूत करू शकला नाही. या १७ मालिकांपैकी केवळ एकच मालिका अनिर्णित राहिली. पण आता आयर्लंडच्या भूमीवरही मालिका विजयाची मालिका खंडित झाली आहे.

भारतीय संघाचा दारुण पराभव

रविवारी स्टॉर्मोंट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात जय मुंद्राने आपल्या घातक गोलंदाजीने पहिल्या दोन चेंडूंवर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना शून्यावर बाद केले. . यानंतर, त्याने कर्णधार श्रेयस अय्यरची महत्त्वाची विकेट घेऊन भारताचे कंबरडे मोडले. आयर्लंडच्या १५४ धावांच्या प्रत्युत्तरात, भारतीय संघ ९ विकेट्स गमावून केवळ १५३ धावा करू शकला आणि फक्त धावेने सामना गमावला.

अय्यरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

या सलग दोन पराभवांमुळे, ३१ वर्षीय श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून आपले पहिले दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामने गमावणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम केवळ ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतने जून २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत कर्णधार म्हणून पदार्पण केले होते आणि आपले दोन्ही सुरुवातीचे सामने गमावले होते.

महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के

Web Title: India vs ireland t20 series shreyas iyer team india 16 series winning streak ends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Virat Kohli : ‘किंग’ने  मोडला ‘मास्टर’चा Record, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा
1

Virat Kohli : ‘किंग’ने मोडला ‘मास्टर’चा Record, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट
2

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
3

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
4

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.