Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने, महामुकाबला की महावाद? रविवारी दुबईत रंगणार युद्ध

पाकिस्तानने बऱ्याच ड्रामानंतर युएईला हरवत सुपर ४ मध्ये स्थान पक्के केले आहे आणि आता पुन्हा एकदा भारताच्या समोर रविवारी महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान ही मॅच युद्धापेक्षा नक्कीच कमी नाही

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2025 | 10:23 AM
पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि पाकिस्तान पुन्हा समोर
  • रविवारी रंगणार सुपर ४ चा सामना
  • दुबईत भारताविरुद्ध खेळणार पाकिस्तान 

पाकिस्तानने आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात पाकिस्तानचा सामना युएईशी झाला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आणि पाकिस्तानने विजय मिळवला. मात्र या सामन्याआधी पाकिस्तानने बरीच नाटकं करत पुन्हा एकदा सर्वांचा रोष ओढवून घेतल्याचे दिसून आले. युएईवर ४१ धावांनी घेतलेल्या विजयाने पाकिस्तानला सुपर फोरमध्ये स्थान मिळवून दिले. आशिया कप २०२५ चा सुपर फोर सामना २० सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे आणि यात आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून येत आहे. 

कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी आहे?

आशिया कपमधील आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील. तेथे सर्व चार संघ एकमेकांशी भिडतील. भारतीय संघ त्यांच्या पहिल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानशी भिडेल. हा सामना २१ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री ८:०० वाजता सुरू होईल. हा पाकिस्तानचा पहिला सुपर फोर सामनादेखील असेल.

मागील सामना पूर्णपणे एकतर्फी 

भारत आणि पाकिस्तान १४ सप्टेंबर रोजीही एकमेकांशी भिडले होते. गट अ मधील स्थानामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर झाली. दुबईमध्ये खेळलेला तो सामना भारताने ७ विकेट्सने सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने फक्त १२७ धावा केल्या. त्यांच्या फलंदाजांकडे भारताच्या फिरकी गोलंदाजीला उत्तर नव्हते. भारतीय संघाने १६ व्या षटकात लक्ष्य गाठले. यामुळे आता बदला घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ उत्सुक असणार आणि सध्या दोन्ही देशांमधील असलेले तणावाचे वातावरण पाहता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटू शकतं यात काहीच शंका नाही. 

IND W vs AUS W: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेमध्ये मालिका १-१ ने बरोबरीत

अंतिम फेरीतही टक्कर होण्याची शक्यता

आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येऊ शकतात. आशिया कपचा अंतिम सामना सुपर ४ मधील अव्वल दोन संघांमध्ये खेळला जाईल. गट ब मधील सुपर ४ साठी पात्र ठरणाऱ्या संघांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. 

बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यापैकी कोणतेही दोन संघ पुढील फेरीत पोहोचू शकतात. भारतीय संघ २४ आणि २६ सप्टेंबर रोजी सुपर ४ चे इतर दोन सामने खेळेल. प्रेक्षकांसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान ही नेहमीच पर्वणी ठरली आहे. पण सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सामन्यांदरम्यानही तणावाचे वातावरण दिसून येत आहे. 

Web Title: India vs pakistan in asia cup 2025 again sunday match will be more dramatic for cricket lovers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
1

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय
2

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?
3

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?

Asia cup 2025 : पाकची शरणागती? भारताला लवकरच मिळणार Asia cup ट्रॉफी! BCCI सचिवांनी दिली अपडेट, म्हणाले… 
4

Asia cup 2025 : पाकची शरणागती? भारताला लवकरच मिळणार Asia cup ट्रॉफी! BCCI सचिवांनी दिली अपडेट, म्हणाले… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.