Team India (Photo Credit- X)
And that’s how it is done 😎 🔥#TeamIndia comprehensively win the 2️⃣nd ODI by 102 runs and level the 3 match series 1️⃣-1️⃣ Scorecard ▶️ https://t.co/64x1QjUHl9#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lXaEYxrqKq — BCCI Women (@BCCIWomen) September 17, 2025
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी मिळाल्यावर टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी करत शतकी खेळी केली. तिने ९१ चेंडूत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. स्मृती मानधनासह दीप्ती शर्मानेही ४० धावांची महत्त्वाची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर भारताने ४९.५ षटकांत २९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राउनने तीन, तर ऍश्ले गार्डनर आणि मेगन शट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
२९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. केवळ १२ धावांमध्ये त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ ४०.५ षटकांत केवळ १९० धावाच करू शकला. त्यांच्याकडून अॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक ४५ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत क्रांती गौरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच, दीप्ती शर्मानेही दोन बळी मिळवले. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शनिवार, २० सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.






